Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४० ). मध्य राजकीय वर्चस्व प्रस्थापित करून ते अतिशय भरभराट प्रित पोहोंचले होते, आणि सुद्ध हिंदुस्थानांनी मोंगली, बादशाहत स्थापन होणाच्या पूर्वी-सेल्जुक व ऑटोमन तुकौशिवाय तिस-य:- अफगाणचेंच राज्य होतें. आणि पुढे मोंगलांनी आपली बादशाहत स्थापन केली होती. मोंगल लोक हे प्रसंग पडेल त्याप्रमाणे पंथांतर करीत असत; तथापि त्यांच्यातील अस्सल धर्मनिष्ठा अथवा कडवेपणा यांत मात्र तिळमात्रही कमतरता होत नसे, हिंदुस्थानच्या इतिहासांतील भावी प्रसिद्ध पुरुष अलप्तगीन, सचकगीन, महंमूद गज्नवी हे तुर्क होते; चंगीझखान व तैमूरलंग हे उभयताही पराक्रमी पुरुष मूळचे मोंगल होते, आणि हिंदुस्थानांत मोंगली बादशाहतीची स्थापना करणारा बादशहा जहरूनि महंमद बाबर हा बापाकडून तैमुरलंगाचा सहावा वंशज असून तो आपल्या आई कडून चंगीतखानाचा वंशज होता; मोंगल लोक हे मंगोलिया प्रांतांतून आशियांत आल्यानंतर आपणास तुर्क असेही ह्मणवून घेऊं लागले. मुसलमानी समाजानें, आशिया, युरोप व आफ्रिका खंडांत अनेक दिग्विजय मिळविले; पण त्याबरोबरच गुलामगिरीस जोराचें चालन मिळून तिचें अतिशय प्राचल्य झालें; महंमद पैगंबराच्या काळापासून मुसलमानी धर्म स्थापन होऊन त्याचा जोराने चोहोंकडे प्रसार करण्यात मुसलमानानी प्रारंभ केल्यानंतर जे परधर्मीय लोक आपला धर्म स्वपीने स्वीकारणार नाहीत त्यांच्यांशी युद्ध करून व त्यांना जिंकून इस्लामी धर्माची दीक्षा देण्याचा व त्यांना गुलाम करून आपल्या देशांत नेण्याचा सारखा सपाटा चालविला. या गुलामांत खी, पुरूष व मुळे या सर्वांचा समावेश होत असे; व या लोकांकडूनच ते आपलीं का करून घेत असत, यापैकीं इमानी व कष्टाळू गुलामांस जरी ते स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवीत आणि सुंदर स्त्रियांशीं लर्मे करीत तरी- आणि गुलामगिरीच्या या पद्धतीमुळे, व इस्लामी धर्माचें गुलामगिरीस पाठबळ असल्यामुळे जरी त्यांच्या धर्माचा प्रसार व्यापकपणें होण्यास हीच पद्धत बहुतांशी कारणीभूत झाली असली तरी- एकंदरीत त्यामुळेच गुलामगिरीचें अतिशय प्रावल्य माजले; आणि आशियाप्रमाणेच युरोपखंडांतही या पद्धतीचा उपक्रम झाला. ऑटोमन सुलतानही, युरोपात अशाच प्रकारें जेव्हा जेव्हा नवा प्रदेश हस्तगत करून घेत त्या त्या वेळी तेथील ख्रिस्ती लोकांस गुलाम करून स्वदेशांत आणित असत, पुढे त्यांतील तरुग, देखणे व चलाख मुलगे निवडून काढून, ब त्यांना उत्तम लष्करी शिक्षण देऊन त्यांच्या स्वतंत्र पलटणी बनविण्याची नवी पद्धत त्यांनी सुरू केली व तिला त्यांनी "जान-निसारी" अथवा जीवसंरक्षक ( याचाच जॅनिझरी, व “ ज्यानिशरीज " Janizaries हा अपभ्रंश आहे. ) है नांव दिलें. हें सैन्य विशेष उपयोगीं च परिणामकारक कामगिरी बजाविणारें असें होतें, त्यामुळें पुढें युद्धे C