Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, ऑटोमन तुर्क बादशहांपैकी विजयी व प्रसिद्ध बादशहा सुलतान सुलेमान धी ग्रेट याच्या कारकीच्या अखेरीपर्यंत (इ० सन १५२० ते १५६५) हे राज्य अत्यंत भर मराठीत होतें; त्यांनीं क्रोमियाचें द्वीपकल्प, ग्रीस, हंगेरी, इराण, अरबस्थान, इजिप्त, मेसापोटेमिया, सीरिया, आरिजवर्स, ट्यूनिस आणि उत्तर आफ्रिकेचा बहुतेक भाग, व न्होड्स बेट- हे सर्व प्रदेश आपल्या हस्तगत करून घेऊन भूमध्य समुद्रावर आपली सत्ता बसविली होती, आणि पूर्वेस युफ्रेटीस नदी, पश्चिमेस जिब्रालटर, दक्षिणेस नाईल नदीवरील मास्वान अथवा आसु अन ( Assuan ) आणि उत्तरेस हंगेरीतलि बुधापेरत या शहरा- पर्यंतच्या व्यापक प्रदेशभर त्यांचा अंमल चालत होता; शिवाय त्यांनी इतालींत प्रवेश केला होता, आणि हंगेरी देश हस्तगत केल्यानंतर ते थेट जर्मनीच्या सरहद्द्वीपर्यंतही जाऊन पोहोचले होते; हंगेरी देश पुढे दीडरों वर्षेपर्यंत ऑटोमन तुर्कीच्या ताब्यांत होता; व त्यानंतर तो स्वतंत्र झाला; परंतु ग्रीस देश अजमार्से चारशे वर्षे त्यांच्या ताब्यांत होता; या अवधीत ग्रीक लोकांना त्यांच्याकडून अतिशय त्रास झाला; त्यामुळे ते तुच्या अंमलाला अगदी कंटाळून जाऊन त्यांनी त्या राजायरोचर इ० सन १८२१ मध्ये युद्ध आरंभिलें; यावेळी त्यांना साल करण्याकरितां इतर युरोपियन राष्ट्रांनीही मदत पाठविली व हैं युद्ध पुष्कळ काळपर्यंत चालू राहिलें; त्यांत उभयपक्षांची पुष्कळ प्राणहानी झाली, आणि याच युद्धांत ग्रीक लोकांच्या मदतीस आलेला इंग्लंडमधील प्रसिद्ध कवी लार्ड बायरन हा मारला गेला; पुढे ग्रीक लोकांस साह्य करण्याकरितां, इंग्लिश आरमाराधिपती सर एडवर्ड कॅड्रिंग्टन याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड, फ्रान्स, आणि रशिया, या तीन्हीं राष्ट्रां एकत्र झालेले आरमार इ० सन १८२७ च्या आक्टोबर महिन्यामध्ये नॅव्हारिनोच्या आखातांत आलें; या आरमारानें तेथील तुर्क आरमारावर हल्ला करून त्याचा पूर्णपणे विध्वंस उडविला व तुकचा पूर्ण पराभव होऊन इ० सन १८२९ मध्ये ग्रीस देश तुर्क सत्तेपासून पूर्णपणे वतंत्र झाला. अशा रीतीने सुलतान सुलेमानच्या मृत्यूनंतर ऑटोमन तुर्कांच्या सोस ओहोटी लागत गेली आणि त्यांनी मिळविलेले बहुतेक सर्व प्रदेश यांच्या ताब्यांतून एका- मागून एक नाहीसे होत जाऊन, आजच्या स्थितीत तर टकचें राज्य है पूर्वपनवाचें, ऐश्वर्याचें व जयजयकाराचें एक निव्वळ छायाचित्र म्हणूनच कायतें अस्तित्वांत राहिलेलें आहे. १ वरील विवेचनावरून हे लक्षात येईल कीं, मुसलमानी समाजांतील आरब व तुर्क-यांत सेल्जुक व ऑटोमन या दोन्हीं तुचा समावेश होतो-यांनी जगांत मोठमोठे पराक्रम गाजवून राज्येही निर्माण केली होती त्यानमाणेच त्यांच्यातील मोंगल लोकानी- ही अनेक पराक्रम गाजविले असून काही काळपर्यंत त्यांनींही आपले निर्विवाद