Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३८ ) अथवा तुर्कस्थानामध्ये राज्य असून तेथील मागे होऊन गेलेल्या व घालू सुलतामास याच मूळ पुरुषाच्या नावावरून सर्वसाधारणतः " उस्मानअल्ली " या नामाभिधा- नानें संचोधण्यात येत असतें, उस्मान नंतर त्याचा मुलगा ओखान हा गर्दीवर आला. हाही मोठा शूर असून त्यानें आपल्या राज्याचा बराच विस्तार केला; त्याच्यानंतर प्रसिद्ध सुलतान मुराद हा अधिकागरुढ झाला; याच्या कारकीर्दीत ऑटोमन तुकांनी इ० रुन १३५८ मध्यें हेलेस्पांटची सामुद्रधुनी ओलांडून युरोपखंडीत प्रवेश केला, आणि पुढील अवध्या चाळीस वर्षातच बाल्कन द्वीपकल्पाचा सर्व व्यापक पट्टा त्यांनी आपल्या सत्तेखाली आणिला. सुलतान मुराद हा २९ वर्षे राज्य करून इ० सन १३८९ मध्यें मृत्यु पावला आणि बयाजीद हा गादीवर आला; हाही सुलतान कर्तृत्ववान असून त्यानेंटी ऑटोमन राज्याचा विस्तार केला. बल्गेरिया प्रांतांतील निकोपोलिम येथील युद्धति जुटीच्या व जोरदार विस्ती सैन्याच्या पूर्ण पराभव करून त्यांची भयंकर कत्तल उडविली; आणि पूर्व रोमन बादशाहतीच्या राजधानीचें शहर कान्स्टॉटिनोपल हस्तगत करण्याच्या तो उद्योगास लागला; परंतु इतक्यांतच समरकंद येथील झगताई मोंगल गजघराणें पालधें घालून तेथील राजगादी इ० सन १३६९ यावर्षी बळकाविणारा प्रसिद्ध धाडसी पुरुष तेमूरलंग ( जन्म इ० सम १३३५ मृत्यु इ० सन १४०५ मध्यें उचार येथें ) यानें बायजीदवर स्वारी करून त्याचा अंगोरा येथें पराभव केला; त्यामुळे कान्स्टाटिनोपलला दिलेला शह त्यास मार्गे घेणें भाग पडलें, तथापि सुलतान दुसरा महमंद याच्या कारकीर्दीत (३० सन १४५१ ते ३० सन १४८० ) तुर्क- लोकांनी पुन्] कास्टटिनोपल या शहरास वेढा देऊन तें इ० सन १४५३ मध्यें इस्तगत 1 " करून घेतले आणि तेथील बादशहाचा वध करून तेथें आपली बादशाहत स्थापन केली; त्यामुळे युरोपका भाव इतिहास रुाफ बदलून गेला; त्यामुळे पुढे सतत एक शतकभर युरोपियन खिम्ती राष्ट्रांना ऑटोमन तुर्क ही एक जिवंत आणि "मूर्तिमंत भीति " भासूं लागली; त्यामुळे युरोपातील सर्व ख्रिस्ती राष्ट्रांची स्थिती अत्यंम चिंताजनक, व अशाम्बत अशी बनून गेली; व पुढील शंभर वर्षे सर्व युरोग्खंडभर त्यांचा भयंकर दरारा पाटत राहिला; त्यामुळे त्यांच्या स्वतःसंबंधींच्या आत्मविश्वासास, कर्तृत्वास आणि कर्तबगारीस जोराचें चालन मिळून त्यांनी अनेक दिग्विजय केले, त्यामुळे इस्तंबूल येथील सेंट सोफियाच्या मंदिरावर सतत एक हजार वर्षे फडकन अरलेला ख्रिस्तांचा क्रूस तेथून निघून त्याठिकाणी आजतागायत मुसलमानांचा चांद फडकत राहिला आहे, आणि थोडक्यांत ह्मण ने मुसलमान लोकांनी जगाच्या इतिहासांत अनेक पराक्रम गाजवून, आपली कर्नचगारी आपल्या शत्रूंच्या पूर्णपणे प्रत्ययास आणून दिलेली आहे.