Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३७ ) आशियामायनर आणि इराण, हे देश जिंकून भूमध्यसमुद्रापासून तो तहत अफगाणि- स्थानापर्यंतच्या व्यापक प्रदेशभर आपली सत्ता गाजविली; परंतु सीरिया प्रांत व जरूसलेम तुर्क लोकांच्या ताब्यांत गेल्यानंतर, ख्रिस्ती लोकांना त्यांच्याकडून अतिशय त्रास होऊं लागला; जरूसलेम हैं शहर आशियाखंडाच्या पश्चिमभागों पालेस्टाईन अंतांत असून से यशख्रिस्ताचें चरित्रस्थळ आहे; हे शहर सेल्जुक तुर्कांच्या हस्तगत झाल्यानंतर त्यांनी त्याठिकाणचीं 'ख्रिस्तीमांदरें जमिनदोस्त केली आणि आंतशय धार्मिक जोरजलूम सुरू होऊन त्याठिकाणी दर्शनास जाणान्या ख्रिस्ती लोकांसही अतिशय त्रास होऊं लागला; पिटर या नांवाचा फ्रान्स देशांतील एक साधू जरुसलेम येथे गेल्यावेळी त्यास तुर्क लोकांकडून ख्रिस्ती लोकांस अतिशय त्रास होत असल्याचे आढळून आलें; तेव्हा त्यानें युरोपात परत जाऊन सर्व ख्रिस्ती राष्ट्रांच्या दरबारी ही हकीकत कळविली, आणि यात्रेकरू वगैरे रिवस्ती लोकांना दुःखमुक्त करण्याबद्दल त्यांना विनंती केली; त्यावरून विस्ती राष्ट्रांनी एक होऊन तुर्क लोकांशी अनेक धर्मयुद्ध केली; परंतु अखेरांस जरूस लेम त्यांच्या हातीं न येतां तें मुसलमानांच्याच ताब्यांत कायम राहिलें. बगदाद येथील आढचासी खिलापतीच्या ताब्यांतील पूर्वेकडील सत्तेचा नाश सामानो सुलतानांनी आणि पश्चिमेकडील सत्तेचा नाश सेल्जूक तुर्कीनों केल्यानंतर पुढे ३० सन १९५८ मध्ये चंगांजखानाच्या वंशातील मोंगलांनी ती पूर्णपणे मष्ट करून टाकिली; याच वर्षी इस्माईल या नांवाच्या मूळच्या एका सारासान अथवा आरब वंशातील पुरुषाने स्वपराक्रमानें इराणचें राज्य मिळविले आणि तेवीस वर्षे राज्य करून तो इ० सन १२८१ मध्यें मृत्यु पावला; याच घगण्यांत पुढे आव्यास या नांवाचा एक मोठा शूर व पराक्रमी राजा गादीवर येऊन त्यानें तुर्क लोकांचा अनेक वेळा पराभव केला; आणि याच शाहाने ( इराणच्या बादशहास शाहा अथवा सोफी असें म्हणतात. ) इराणी आखाताच्या तांडाजवळ असलेले ऑर्मझ हे बेट इ० सन १६२२ मध्यें, इंग्रजांची मदत मिळवून पोर्तुगांज लोकांजवळून जिंकून घेतलें. 66 सेल्जुक तुर्काप्रमाणेच दुसरा बलाढयवर्ग म्हणजे " ऑटोमन तुर्क " हा होय; याच ऑटोमन तुर्कीनों, सेल्जुक तुर्कीच्या सत्तेचा नाश केला; आर्तोघल या नावाच्या एका शूर सरदाराचा मुलगा उस्मान (जन्म इ० सन १९५८, मृत्यु इ० सन १३२६ ) हा मोठा शूर व पराक्रमी निपजून त्यानें इ० सन १२८८ मध्ये आशियामायनरमधील सेल्जुक तुर्कांचे राज्य हस्तगत केलें, आणि यावेळेपासून ऑटोमन तुर्कांचा काहीं काळपर्यंत परमावधीचा राजकीय उत्कर्ष होत गेला. " उस्मान " या नावावरून " ऑटो- मन हा शङ्क प्रचारात आलेला आहे, याच ऑटोमन तुर्क लोकांचं हल्ली युरोपांतील टर्की