Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४ ) ओघानेंच त्यास किंमत न वाटणें स्वाभाविक होते. त्यामुळे त्याने एकदां बायबलची ( ख्रिस्ती लोकांच्या धर्मग्रंथाची ) होळी केली तर एकदां प्रत्यक्ष बुखारा येथेलि मशीदींतील कुराणही त्यानें घोड्याकडून तुडविलें! ही गोष्ट तो जिवंत असतांनाची आहे. पण आपल्या मृत्यूपूर्वीही या रुधिरप्रीय मनुःयाने आपल्या मृत्यूनंतर आपल्या आम्याच्या शेवे- करिता चाळीस कुमारिकांचे आत्मे पाहिजेत अशी आज्ञा केली होती; त्याप्रमाणें तो मृत्यू पावला तेव्हां चाळांस कुमारिकांना ठार मारण्यांत आलें! चंगीझखान हा इ. सन. १२२७ मध्यें कास्सियन समुद्राच्या कांठीं मृत्यू पावला. या पुरुषाइतका अत्यंत बलाढ्य, पण तितकाच क्रूर, भडागी, अविवेकी व अनावर असा पुरुष निपजल्याचें इतिहासांत दुसरें उदाहरण दृग्गोचर होत नाहीं; आणि त्यामानानें खलीफा उमर व त्याचा सरदार अमरू है पुष्कळच बरे असें झटल्याशिवाय रहावत नाहीं. सीरिया व इजिप्त या देशांप्रमाणेच याच काळांत अरब लोकांनी इराण देश जिंकून घेतला. यावेळी इराण देशांत सासानिध उर्फ सासान कुळांतील येझदिजिर्द या नांवाचा राजा राज्य करीत होता. अरब लोकांनी इराणच्या राज्याच्या अमलाखालील ईराक्श है शहर हस्तगत करून घेतलें, तेव्हां ते परत घेण्याकरितां, येझदिजिर्द यानें फिरुकशाद या नावाच्या आपल्या एका शूर सरदाराबरोबर एक मोठे सैन्य देऊन त्यास त्यांच्यावर पाठविले; परंतु अरच सरदार सादएन वाकास यानें त्याचा पूर्ण पराभव करून त्यास माघार घेणे भाग पाडिलें. ( इ० सन ६३८ ) तथापि उभयतां मधील है युद्ध समाप्त न होतां पुन्हा पुढे ३० सन ६४१ मध्यें नाव्हाद या ठिकाणी मोठ्या जोराचें युद्ध झालें; असेरीस अरब सरदार नोमन यानें इराणी सैन्याची पूर्णपणे धुळधाण उडविली; राज्यकर्ता येशदिजिर्द हा मारला गेला, आणि साढे चारशें वर्षे इराण देशावर राज्य करीत असलेल्या सासान घराण्याचा नाश होऊन त्या देशावर अरथ लोकांचा अंमल चालू झाला; अशा रीतीनें इराण देश अरब लोकांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांनी त्या देशांतून सीरिया देशाप्रमाणेच पुष्कळ गुलाम पकडून स्वदेशांत आणिले; अशा गुलामांपैकी एकाचा न्याय करीत असतो त्याने खलीका उमर यास सुन्याने भोसकून ठार मारिले ( ३० सन ६४४ ) त्यानंतर लोकसभेनें त्याच्या जागी उस्मान याची खलीफा ह्मणून नेमणूक केली. सलीफा उमर हा विशेष शिस्तीचा व सांधा पुरुष होऊन गेला; त्यास डामडौल आवडत नसे; या काळापर्यंत हिजरी सन फारसा प्रचारात नव्हता, तो या खलीफा चालू केला, आपल्या सैन्यास नियमीतपणे पगार देण्याची व वृद्ध आणि व्यंगत्व आलेल्पा सैन्यातील लोकांना बेर्डे वेतन देण्याची त्यांने नवी पद्धत सुरू केली, सारांश हा खलीफा मोठा कर्तृत्ववान शूर व नामांकित होऊन गेला यात संदेह नाहीं,