Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५ ) खलीफा उमर नंतर गादीवर आलेला खलीफा उस्मान हाही मोठा शूर व पराक्रमी असून त्याने आपल्या कारकीर्दीत एक प्रचंड आरमार तयार केलें, आणि भूमध्य समुद्रावर आपली सत्ता प्रस्थापित करून माल्टा, लेडस, ग्रीस, आणि आफ्रिकेचा उत्तर भाग जिंकून आपल्या ताब्यांत आणिला प्रसिद्ध व पुरातन शहर कार्थेज जिंकून घेऊन त्याचा विध्वंस उडविला, व या सर्व प्रदेशाचा तो पूर्ण सत्ताधीश बनला. या खलिफानें आपल्या कारकीर्दीत कुराणाची एक प्रत शुद्ध करवून बाकीच्या अस्तित्वात असलेल्या सर्व प्रती जाळून टाकिल्या; ह्रीच शुद्ध प्रत आजतागायत अस्तित्वांत व चालू राहिलेली आहे. या काळापासून मुसलमानांत आपसांत वर्चस्व प्राप्तीकरितां भयंकर द्वेषभाव उत्पन्न होऊन त्यांतच या खलिफाचा वध झाला, व चवथा खलिफा अल्ली हा गादीवर आला. या चारी खलिफांच्या कारकीर्दीत मुसलमानांचे अतिशय महत्व वाढले; त्यांनी निरनिराळ्या- व्यापक प्रदेशावर आपले राजकीय व धार्मिक वर्चस्व प्रस्थापित केलें, तुर्कस्थान, सीरिया, इराण, काचूल, तार्तरी, मितर वगैरे देशांवर स्वान्या केल्या, आणि थेट हिंदुस्थान देशा- पर्यंत आपले राजकीय आकर्षण आणून भिडविलें. चवथा खलीफा अल्ली याच्या कारकीर्दीत मुसलमानांतील आपसांतील द्वेष- भावाची परमावधी झाली; आणि त्यांत अल्लांचा खून होऊन त्याचे मुलगे हरून व हुसेन हे इराणांत पळून गेले, व उमईद वंशांतील मुआविया या नांवाच्या एका शूर पुरुषार्ने (हा सीरिया प्रांताचा सुभेदार होता.) मदिना येथील खिलाफत बळकावून ती दमास्कस येथें नेली. ( इ० सन ६६१ ) त्यानंतर त्याने हसन व हुसेन यांचा पिच्छा पुरवून त्यांचा व त्यांच्या विस्तृत वंशाचा मोठ्या क्रूरपणाने नाश केला. पैगंबराच्या वंशाची ही मोठी क्रूर कत्तल हल्लीं मुसलमान लोक ताबुतांत दाखवितात. यासंबंधी थोडक्यांत अशी हकीकत आहे कीं, मुआवियाचा मुलगा यजीद यानें, इ. सन ६६९ यावर्षी अल्लीचा वडील मुलगा हसन यास विष प्रयोग करून ठार मारिलें; आणि त्याचा धाकटा भाऊ हुसेन यास मी " खलिफा " आहे, अशी त्यानें शफत पूर्वक कबूली यावी ह्मणून त्यास अतिशय आग्रह केला, परंतु हुसेन हा तशी शफत घेऊन कबूली देईना; त्यामुळे मजीद यास अत्यंत राग येऊन त्यानें हुसेनवर सैन्य पाठविलें, व त्याच्याशी घनघोर संग्राम केला. या युद्धास सकाळपासून प्रारंभ झाला व त्यांत हुतेनचे सर्व सोबती एकामागून एक तीर लागून मृत्यू पावले. यापैकीं सतरा माणसें फातिमाच्या औरस वंशतिलि होती. शिवाय हुसेनचीं लहान लहान मुलेही तीरांच्या जखमानी मृत्यू पावलीं, हुसेन यांस सर्व शरीरभर चौतीस जसमा लागून आणि त्याच्या अंगांत तीस तीर राहून - तोही शेषढी मृत्यू पावल T