Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७ ) मुसलमानी धर्मसंस्थापक महंमद पैगंबर हा मृत्यू पावल्यावर दीडशे वर्षांच्या आंतच मुसलमान लोकांनी मोठमोठाले पराक्रम करून- आशिया, यूरोप आणि आफ्रिका या तीन्हींही संडांत दिग्विजय करून आशियामायनर, तुर्कस्तान, सीरिया, इराण, अफगाणि स्थान, तार्तरी, मिसर वगैरे देशांत आपले राजकीय वर्चस्व स्थापन करून या सर्व प्रदेशांमध्ये आपल्या धर्माचा इतका झपाट्यानें विस्तार केला की, त्या धर्माच्या लोकांची संख्या वीस कोटीपर्यंत वाढली. त्याप्रमार्गेच, मुसलमान लोकांनी अशा रीतीने विलक्षण दिग्विजय संपादिल्यामुळे जगाच्या राजकीय इतिहासांतही चमत्कारिक स्थित्यंतर घडून आले; सीरिया देश अरब लोकांनी जिंकून घेतल्यामुळे ख्रिस्ताची चरित्रभूमी असलेले जरूसलेम है शहर मुसलमान लोकांच्या ताब्यांत गेलें; त्यामुळे ख्रिस्ती लोकांचें त्या भागांतील महत्व कमी झालें, आणि मुसलमान लोकांनी त्या प्रांतावर “ जिझीया " कर बसविला. तथापि हा कर देण्याचे ज्या ख्रिस्ती लोकांनी कबूल केलें, त्यांना अरच लोकांनी कोणत्याही प्रकारें उपद्रव दिला नाहीं; इतकेच नाही तर उलट ख्रिस्ती देवालयें, व त्यांच उत्प त्यांनी पूर्वीप्रमाणेच निषेध रीतीनें कायम चालू ठेवली. त्याप्रमाणेच त्यांनी इराण देश हस्तगत केल्यावर तेथील लोकांचें व त्यांच्या धर्माचें हजारों वर्षी शसून चालत आलेलें महत्व नष्ट झालें. या लोकांपैकी काहीनों मुसलमानों धर्माचा स्वीकार केला. परंतु जे विशेष अभिमानी होते त्यांनी मुसलमानी धर्म स्वीकारला नाहीं, व त्यांचा अंमलही कचूल केला नाही. त्यामुळे त्यांना देशत्याग करावा लागला, व ते इराणांतून हिंदुस्थान देशांत आश्रयाकरितां पळून येऊन पश्चिम किनान्यावर गुजराथेत नवसरी, संजन वगैरे ठिकाणी स्थाईक झाले. हेच लोक, हल्ली हिंदुस्थानात असलेले " पारशी " असून त्यांना या देशांत स्थाईक होऊन बाराशे वर वर्षांचा काळ लोटला आहे. व आजतागायत त्यांनी आपला धर्म कायम ठेविला असून ते आपल्या जुन्या देवतांचीच उपासना करीत आहेत. इराण देशाप्रमाणेच अरबांनी, इजिप्त सह आफ्रिकेचा दक्षिण किनारा आपल्या हस्तगत करून घेतला व त्या सर्व प्रदेशविरही त्यांनी आपले वर्चस्व स्थापन करून ते बलाढ्य चनले. - महंमदाने स्थापन केलेल्या धर्मास " इस्लाम " ह्मणजे तारण मार्ग, अथवा इस्लामी धर्म झणजे तारक धर्म, अशी संज्ञा असून मुसलमानांच्या धर्म ग्रंथास 'कुराण' असें लगतात; मनुष्यास त्याच्या मृत्यूनंतर पुनर्जन्म येत नाहीं, एकट्या परमेश्वरा- पांचून दुसरा देव नाहीं, ज्याच्या त्याच्या बन्यावाईट रुतीप्रमाणे व पापपुण्याप्रमाणे परमेश्वर त्यास फळ देत असतो, मनुष्य मृत्यु पावल्यावर त्यास बरी अथवा वाईट गती लागलीच न मिळता त्याचा जीवात्मा तसाच पडून राहून नंतर परमेश्वर एकदाच सर्वोचा