Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६ ) , निमित्ताला टेकलेल्या भांडणाला मूळ कारणीभूत आहेत” * या सर्व विवेचनावरून सागरी सत्तेचें केवढे महत्व आहे, आणि त्यामुळे व्यापार, व संपत्ती कशी मिळवितां येते आणि सागरी सत्तेमुळेच वाढत जाणा-या व्यापारमुळे राष्ट्राचा केवढा उत्कर्ष होतो, याचें कोणातही सहज अनुमान करितां येईल; याच सागरी सत्तेच्या जोरावर इंग्लंडने आपला व्यापार अतीशय भरभराटीस आणिला आणि त्याच व्यापाराने मिळविलेल्या संपत्तीने आपल्या आरमाराची अधिक अधिक सुधारणा करून त्यांत भर घातली; या बाबतीत अर्ल ऑफ डॅन्ची यांस बितभेन यानें पाठविलेल्या पत्रात (ता. २५ जून इ. सन १६६७ " डॅन्चीची पर्ने" पान ३१५ पहा ) तो ह्मणतो की, " सतरा वर्षीच्या मार्गे या बाबतीत बोलणान्या लोकांनी बांधिलेल्या अटकळीहूनही अधिक प्रमाणानें आपला व्यापार आणि नौकानयन यांची सुधारणा करण्यांत राजाला यश आले आहे... आणि आतां तर इंग्लंडच्या व्यापाराचा इतका कळस झाला आहे कीं, तो इतका वाढेल, यावर भरवसा ठेवणे हे जितकें एकेकाळी कठिण होतें, तितकेंच तो असाच पुढेही चालू राहील, असें मानणेही कठीण आहे. " वरील विवेचनावरून इंग्लंडचा व्यापार किती भरभराठींत आला होता, त्या व्यापारावर इंग्लंडला केवढा नफा मिळत होता हा व्यापार , कायम रहावा ह्मणून इंग्लंडचें राष्ट्र फेवढी आस्था दाखवीत होनें, आणि याच व्यापारामुळे, सागरी सत्ता वाढवीत नेऊन, इंग्लंडचें राज्य जगांत केवढे बलाढ्य बनलें, वगैरे बायती संबंधी बराच बोध होण्यासारखा आहे आणि पुढील काळांत इंग्रजांचा मराठ्यांशी संबंध आलेला असल्यानें त्या त्या प्रसंनी इंग्रजासंबंधी माहिती ग्रंथित करण्यांत येणार असल्यानें, या ठिकाणी प्रतिवाद्य विषयास पोषक व आवश्यक तेवढीच अनुषंगिक माहिती दिलेली आहे, आणि थोडक्यात सांगावयाचे ह्मणजे व्यागर व राज्य- ह्मणजे सता, या दोन घायतींची सांगड बांधून, व परस्परांना एकमेकांचा आधार व दुजोरा देऊन हिंदुस्थानांत इंग्रजांनी आपला व्यापार व वर्चस्व यांची वृद्धि केली आहे, आणि तागड़ी व तरवार ही उभयतां परस्परांना पोषक घनल्यामुळे अखेरीस इंग्रज लोक हिंदुस्थान देशाचे सार्वभौम सरकार झालेले आहेत. ● -

  • टीप: " Afre's quoi il serrit tre's difficile aux autres

puissances de cantester aux Anglais cet empire de la mer auquel ils out de tout temps aspire', et dont aujourd'hui ils se moutrent si avides qu'on peut dire que ce dessein et celui de s'emparer de tout le "commeree du monde sont les deux ve'ritables causes de toutes les querelles qu'ils suscitent aux dits E'tats."