Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तहत चीनच्या ईशान्य दिशेपर्यंत लागणाऱ्या प्रत्येक बेटाशी, ज्याठिकणी व्यापार करणे शक्य होते त्या त्या ठिकाणी, युरोपियन राष्ट्रव्यागरी नका, आणि विशिष्ट हक ही मिळविण्या- करिता यावेळी नेटानें झगडत होती. ज्या बक्षिसाकरितां त्यांची चढाओढ लागली होती, त्याचे महत्व किती आहे, हे त्यांना त्यावेळों सुद्धा पूर्णपणे माहीत होतें, आणि त्यानंतरच्या इतिहासावरून असे सिद्ध झालेले आहे की, त्या झगडणा-या राष्ट्रांची युरोपांतील संपत्ती, स्वातंत्र्य, आणि राजकीय वर्चस्व, ह्रीं त्याच्या हिंदुस्थानांतील जयापजयावरच विशेषतः अवलंबून होती. स्पेनचें मेर्डे आरमार आणि सैन्य ही परदेशांतून आणिलेल्या मालाच्या नफ्याच्या पैदासीवरच पोसली जात असत; डच लोकसत्तात्मक राष्ट्रानें प्रतिरोध करण्यांत दाखविलेल्या भयंकर चिकाटीच्या मुळाशीं त्या लोकांचा समुद्रावरील असलेला व्यापार हेच कारण होते आणि इंग्लंडचा मोठेपणाही त्याच्या जगभर पसरलेल्या व्यापारामुळेच प्रस्थापित झालेला आहे, त्या प्रमाणेच इ० सन १६६४ मध्ये इंग्लंड व हालंड या दोन देशांमध्यें व्यापारी चरशीमुळे युद्ध सुरू होण्याचा रंग दिसत होता, त्यावेळी, फान्सच्या गादीवर चवदावा लुई हा राजा असून, त्याचा प्रधान कॉलबर्ट यानें त्याचें मन फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्याकडेस नुकतंच वळविलें होतें, आणि त्याची त्या वेळची राज्यपद्धती शांतता राखण्याची होती; कारण लढाई सुरू झाली तर जे राष्ट्र विजयी होईल त्या राष्ट्राचें आरमारी चर्चस्व अजिंक्य होण्यामध्यें तिचा शेवट होईल असे त्यास भय होतें, आणि इंग्लंड या युद्धति यशस्वी झाल्यास सागरी अजिंक्य सत्ता, व व्यापारी अप्रतिहत वर्चस्व त्या देशास प्राप्त होईल असें त्यास वाटत होतें; त्यामुळे जरी हालंड व फ्रान्स यांच्यामध्यें, तह होऊन त्या अन्वयें, परस्परांनी एकमेकांनां प्रसंगी मदत करावी असे ठरले होते तरी, इ० स० १६६४ मध्ये त्याच्या फ्रेंच वकीलानें त्यास फ्रान्समध्यें जेव्हां लंडन चेथून " इंग्लंड, हॉलंड बरोबर दोन हात करण्यास तयार आहे" (on meurt d envie de les attaquer ) प्रतिस्र्येमुळे त्यांच्यावर ( डच लोकांवर ) हल्ला करण्याकरिता ते ( इंग्रज लोक ) आपली मनगदें चावीत आहेत" ) असे कळविलें तरी नाईलाज होईपर्यंत या युद्धांत हालंडला न मिळतां आरमारी सचेचा समतोलपणा राखण्याकडे त्याची प्रवृत्ती होती; आणि त्यानें इ० सन १६६५ च्या एशील महिन्यामध्ये आपल्या वकिलांना जी प लिहिली त्यांतही अशाच आशयाचा उल्लेख केला होता; तो ह्मणतो; " यानंतर इतर राष्ट्रान] इंग्लंडशी समुद्रांवरल वर्चस्वाप लढाया करणे फार कठीण जाईल. इंग्लिशानी जें वर्चस्व मिळविण्याकरिता नेहमीं धडपड केली आहे, आणि अजूनही आस्था दाखवित आहेत, त्यावरून कोणीही असे ह्मणूं शकेल कों, हा हेतू, आणि जगातील सर्व व्यापार आपल्या ताब्यात आणण्याचा हेतू हे दोन्ही वर नमूद केलेल्या राष्ट्रांराष्ट्रांमधील