Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११ ) " घेण्याकरिता सक हुकूम सोडिले होते; स्थांनी या थायतींत (३० सम १६८७ मध्ये असे लिहिले आहे की, " आझाला आमच्या व्यापारासंबंधाने जितकी काळजी आहे, तितकीच आमच्या दसुलाच्या वाढीसंबंधानेही आहे. कारण याच वसुलामुळे, जरी आमच्या व्यापाराला पन्नास धक्के बसले तरी, आझाला आमचें सैन्य सुरक्षित रासितां येईल; ह्याच वसुलीमुळे आह्माला हिंदुस्थानामध्यें आम राष्ट्र वनविता येईल... आणि याच कारणामुळे इचलोकांची जितकीं सर्व साधारण पत्र आह्मास पहावयास मिळाली, त्यांवरून असें दिससे की, व्यापारासंबंधानें जर या धूर्त लोकांनी एक कलम लिहिले असेल, तर त्यांची राज्य. व्यवस्था, त्यांचे दिवाणी व लष्करी धोरण, लढाया आणि त्यांच्या वसुलाची बाढ, या संयधाने त्यांनी दहा कलने लिहिलेली असत, आणि ह्या वेळी इंग्लिशांचा हेतू त्यांच्या शब्दानींच सांगावयाचा झणजे " डच लोकांप्रमाणेच दिवाणी व लष्करी सत्ता आपणही स्थापन करावी, व अशा तऱ्हेनें आपल्या उत्पन्नाच्या वसुलीची बाय इतकी वाढवावी की त्यामुळे आपणास खात्रीने एक मोठे व मजबूत पायावर उभारिले ब्रिटिशराष्ट्र हिंदुस्थानामध्ये स्थापन करिता येईल. " ( लंडन येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवस्थापक मंडळानें, फोर्टसेंटजार्ज ( मद्रास ) येथील प्रेसिडेंटास ता. १२ दिजंबर इ. सन १६८७ रोजी पाठविलेल्या पत्रातील उतारा ). यावरून हे लक्षात येईल की इंग्रजांनी पूर्वेकडील देशांशी व हिंदुस्थानांशी व्यापार सुरू करून त्या व्यापारावर पुष्कळ संपत्ती मिळविली, आणि हा व्यापार सुरक्षित ठेवण्याकरिता त्यांना याच व्यापारावर मिळविलेल्या संपत्तीच्या मदतीनें आपलें स्वतंत्र सैन्य तयार करून ते नेहमी सज्ज ठेवावे लागलें. आणि व्यापारावर मिळविलेल्या संपत्तिमुळे त्यांना ते देवितां आलें लणजे सागरी सत्ता व आरमारी सामर्थ्य यामुळे त्यांच्या व्यापाराची कल्पनातीत भरभराट झाली; त्यांना अतीशय संपत्ती मिळत गेली, व त्याबरोबरच त्यांचे आरमारी सामर्थ्य, लष्करी चळ, व राजकीय महत्व सारखें वाढत गेलें; इंग्लंडला या व्यापारापासून अतीशय भयंकर नफा मिळत होता; सतराव्या शतकाच्या पहिल्या अर्ध भागांत ईष्ट इंडीज मधील मसाल्यांच्या बेटांतील व्यापार अत्यंत फायद्याचा व महत्वाचा होता, आणि इ. सन १६०६ मध्यें लोव्ह बेटांत एका इंग्लिश जहाजानें व्यापारी मालासह तो विकण्याकरितां जलपर्यटन केलें, त्यांत त्या मालाची विक्री होऊन त्याला मूळ मुद्दलावर शेंकडा दोनशें चौतीस टक्के नफा झाला होता; ( Annals of the East India Company है पुस्तक पहा). जगाच्या राजकीय इतिहासांत सागरी सत्तेचें अत्यंत महत्व मानिलेलें आहे; सर बॉल्टर रेले यांच्या शब्दांत सांगावयाचें ह्नणजे “ज्याच्या ताब्यात समुद्र त्याच्या ताब्यांत व्यापार, ज्याच्या ताब्यांत व्यापार त्याच्या ताब्यांत जगाची संपत्ति, आणि