Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) शेवटी प्रत्यक्ष सर्व जगही * " असते ही गोष्ट अगदी सत्य आहे जगातील कोणत्याही दर्यावद राष्ट्राचें जीवित्व सर्वस्वी परदेशीय व्यापारावरच अवलंबून असते, आणि निदान -

  • टीपः – Whosoever commands the sea, commands the trade,

Whoso-ever commands the trade, .commands the riches of the world; and consequently the world itself. - Raleigh. " सर हफे गिलबर्ट आणि सर वॉल्टर रॅले या नावाचे दोन सावत्रबंधु इंग्लंड मधील डेव्हनशायर प्रांतांतील राहणारे होते. या उभयतांनीं, "उत्तर अमेरिकेत आपण वसाहती कराव्या" अशी एलिझाचेध राणीस सल्ला दिली व गिलचर्ट हा स्वतः इ. सन. १५७८ मध्ये आपणाचरोधर ११ जहाजें व पांचशें लोक घेऊन न्यूफाउंडलंड बेटांत गेला; परंतु ही स्वारी निष्फळ होऊन त्यास परत येणें भाग पडलें; त्यानंतर तो पुन्हा इ. सन १५८३ मध्ये त्याच बेटांत गेला, तेथें एक वसाहत स्थापन करून दक्षिणेकडे किनान्यांची देहळणी करण्याकरितां वळला; तथापि त्याच्या लोकांनी त्यास इंग्लंडमध्ये परत जाण्याविषयीं आग्रह केल्यामुळे तो परत येण्यास निघाला; परंतु एके रात्री समुद्रांत मोठें तुफान होऊन स्यांत तो, त्याच्या बरोबरील सर्व लोक आणि त्याचें “स्कीरल (Squirrel ) है जहाज समुद्रांत बहून, त्या सर्वोचा नाश झाला. सर इंगल्बर्ट ग्रांस "इंग्लिश वसाहतींचा जनक " असे ह्मणतात. गिल्बर्ट प्रमाणेच सर वॉल्टर रॅले हा अमेरिकेत गेला आणि तेथे त्याने एक वसाहत स्थापन केली; हीच इंग्रजांची त्या देशातील पहिली वसाहत असून कुमारी राणी एलिझाबेथ हिच्या सन्मानार्थ तिला " व्हर्जीनिया" है नांव देण्यांत आले; परंतु ही वसाहत पहिल्याने फारशी यशस्वी झाली नाहीं; कारण तेथें वसाहत करण्यास गेलेली मंडळी तेथील जमान लागवडीस आणण्याऐवजी तेथें सोनें मिळाल्यास पहावें ह्मणून उद्योगास लागली; त्यानंतर रॅले हा इंग्लंडमध्ये परत आला; तेव्हां त्याने आपणाबरोबर तिकडून तंबाकू व बटाटे, यांची झाडे इंग्लंडांत आणिलीं] यांपैकीं तंबाकू हा युरोपति पुष्कळच पूर्वी झणजे इ. सन १४९३ मध्यें माहित झाला होता, आणि स्पेन देशांमधील लोकांनी इ. सन १४९२ मध्ये सांटा डोमिंगो बेटांत तेथील इंडियन रहिवाशांनां तंबाकू ओढतांना पाहून, तंबाकूची झाडें युरोपात स्पेन देशांत आणून व लावून, नंतर तंबाकूचा सर्व युरोपभर प्रसार केला होता; तथापि तोपर्यंत इंग्लिशाना, तंबाकू ही काय वस्तू आहे, हे माहित नव्हतें, व रॅले यानेंच त्याची आपल्या देशबांधवांना माहिती करून दिली, असें ह्मणतात; त्याप्रमाणेच रॅले यानें बटाट्यांची झाडें ऐर्लंडमध्ये आपल्या शेतांत लाविली, आणि इंग्लिश व ऐरिश लोकांनां त्या संबंधीची माहिती करून दिली त्या वेळेपासून बढ़ाने इंग्लंड व ऐलेडमध्यें खाण्याच्या उपयोग