Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांतील सर्व परथमव जितमजा, आणि आपला जेता मुतलमानी समाज यांच्यामध्यें भेदभावद्योतक अते कित्येक नवीन नियम निचैव प्रचारांत आणिले; उदाहरणार्थ, जिंक- लेल्या लोकांनी मुसलमानी पेहराव करूं नये; त्यांच्याप्रमाणे शस्त्रे धारण करून रस्त्यानें फिरूं नये; घोड्यावर बसतांना उपलंगीच बसावें; खोगीर उपयोगांत आणूं नये व दरवर्षी त्यांनी काही विविचित ठराविक रक्कम “जीशिया" कर ह्मणून देत जावी, वगैरे; या नियम निर्बंधांचे आपल्या श्रेष्ठ सत्तेवें द्योतक ह्मणून, राजकीय दृष्ट्या जरी समर्थन होण्यासारखे असले तरी सुद्धां हे सर्वच नियम जिंकलेल्या प्रजेस कमीपणा आणणारे होते, आणि त्यांतल्यात्यांत 'जीतिया' हा कर तर त्यांनां विशेषच अपमानकारक व मानभंगकारक, आणि ढोचळ भेदभावदर्शक व जाचक असाच होता; आणि मुसलमान, मुसलमानी धर्माचा स्वीकार केलेले व करणारे नागरिक जन, साधू, फकीर, निराश्रित, व गुलाम वगैरे परिजन, एवढ्यांनाच हा कर कायतो मारु असून, याशिवाय बाकीच्या सर्वांकडून तो सरसकट वसूल करून घेण्यांत येत असे.- ह्मण ने धर्मप्रसार, व राज्यवृद्धी, या दोन बाबतींची मुसलमानानी सांगड घालून त्या एकजीव केल्या. या दोन्ही बाचती परस्परांना आधारभूत राहगाच्या होणान्या व वृद्धी पावणान्या होत्या, त्यामुळे त्या नेहमीच अन्योन्य पोषक होत राहून, मुसलमान लोकांच्या तत्कालिन धार्मिक व राजकीय उत्कर्षास कारणी- भूत झालेल्या आहेत. कारण धर्माच्या नांवाखाली ज्या प्रमाणे त्यांच्या राज्याचा विस्तार होत गेला, त्याप्रमाणेच राज्यवृद्धीनेही उलट धर्मवृद्धीस मदत केल्यामुळे जिंकिलेल्या प्रदेशांत धर्मवृद्धी होत गेलेली आहे; आणि हिंदुस्थान देशांत त्यांची अनेक मुसलमानीं राज्य स्थापन होऊन व त्याशिवाय दिल्ली येथे त्यांनी बादशाहत स्थापन करून काळ ते या देशाचे बादशहाही बनलेले आहेत. व असाच प्रकार विजयानगरकर व मराठे यांच्याही बायतीत घडलेला आहे प्रसिद्ध माधवाचार्य ऊर्क विद्यारण्य स्वामी व त्याचा भाऊ सायण्णाचार्य यांनी, विजया- नगरकर पहिला हरीहर व बुक, व दुसरा हरीहर बगैरे राज्यकर्त्यांना हाताशी धरून-धर्म व राज्य या दोन्हीं बाबतींचा मिलाफ करून, मुसलमानांच्या वाढत्या सत्तेस, “जबरदस्त प्रतिबंधक आडकाठी, " अशी एक मध्यवर्ती राज्यसत्ता निर्माण करून, व वाढीस लावून, तिच्याकडून काही काळपर्यंत मुसलमानांच्या त्या प्रदेशांकडील वाढत्या सत्तेस भयंकर प्रतिरोध करण्याची अत्यंत महत्वाची कामगिरी बजावून घेतली. त्या प्रमाणेच महाराष्ट्रांत समर्थ रामदास व शिवाजी या उभयतांनी मिळून - जरी रामदासानें राजकारगांत केव्हाही प्रत्यक्ष भाग घेतला नाहीं तरी, आणि शीख लोकांप्रमाणे धार्मिक असंतोषामुळे, ह्मणजे स्यांच्या धर्मगुरुचा वध झाल्यानंतर त्यांच्या धार्मिक चळवळीस ज्या प्रमाणे राजकीय स्वरूप