Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८ ) ६२७ मध्ये आपला धर्म स्वीकारणे भाग पाडिलें; आणि इ० मन ६१९ पासून इ० सन ६३२ पर्यंतच्या काळांत सर्व अरबस्थानभर महंमदाच्या या नव्या धर्माचा प्रसार होऊन अरब लोकांच्या इतर देशांवरील मोहिमांनां जोराचें चलन मिळालें; इ० सन ६३२ या वर्षी महंमद हा एका मोहिमेवर गेला असता त्याची प्रकृती चिघडली, आणि तो इतका आजारी झाला कीं, आतां आपण या दुखण्यांतून जगत नाहीं, अशी त्याची खात्री झाली. तेव्हा त्यानें आपणा बरोबरील मंडळीस आपणासमोर बोलावून घेतले; त्यांनी आपल्या या नवीन धर्माची वृद्धि करण्याविषयीं आग्रहानें बजाविलें; या कार्यात ईश्वर तुझांस खात्रीने यशस्वी करील, आणि तुझांस वर्चस्व प्राप्त प्राप्त होऊन तुह्मी श्रेष्ठ- पदासपोहोंचाल, असा त्यानें त्यांना आशीर्वाद दिला; अरबस्थानांत एकी मूर्तिपूजक राहूं देऊं नका, अशी त्यांना ताकीद दिली, आपणा जवळील सर्व संपत्ती गरीब व निराश्रित लोकांना वांटून टाकिली, सर्व गुलामांना बंध मुक्त केले, आणि मदिना येथें आपल्या वयाच्या ६३ व्या वर्षी ३० सन ६३२ मध्यें, शुक्रवारी, आयेशा विधीच्या महालांत, तिच्या मांडीवर डोके ठेवून, मोठ्या शांतपणानें तो मृत्यू पावला. त्यानंतर तीन दिवसपर्यंत त्याचें मृत शरीर लोकांनां पाहण्याकरितां जतन करून ठेवण्यांत आलें, व नंतर त्यास, महंमदानें आपल्या जिवंतपणी बांधिलेल्या मदिना येथील " मशिद उलूबेनी " या ठिकाणी पुरण्यांत आलें. इ० सन ६३२ नंतर हणजे मुसलमानी धर्माचा संस्थापक, व जगांतील एक महाशूर अलौकिक बुद्धीमान, व अचाट कर्तृत्ववान असा पराक्रमी पुरुष महंमद पैगंबर हा मृत्यु पावल्यानंतर, त्याच्या अनु- यायांनी या धर्माचा चोहोंकडे अतीशय प्रसार केला, व काही काळ पर्यंत त्यांनी जगांत निर्विवाद असे आपले राजकीय वर्चस्व संपादन करून ते श्रेष्ठ सत्ताधीश बनून गेले. - - " या नवीन मुसलमानी धर्माचें- इस्लाम धर्माचें- संरक्षण व वृद्धि या प्रीत्यर्थ महंनदानें, व त्याच्या अनुयायांनी जी अनेक धर्मयुद्धे केलीं त्यांस "जिहाद " - लणजे धर्मयुद्ध अथवा धर्मार्थ युद्ध-असे ह्मणतात. अशा युद्धांत जे मुसलमान मृत्यू पावले त्यांना " शहीद " - ह्मणजे धर्माकरितां प्राण देणारे- अर्से लणतात. आणि या शहिदांनां स्वर्ग लोकाची प्राप्ती होत असते, अर्से ते मानितात. महंमद व त्याचे अनुयायी हे युद्धांत पाडाव करून आणलेल्या लोकांनां होतां होईल तो आपला धर्म स्वीकारण्यास भाग पाडीत असत; आणि हा धर्म न स्वीकारिणाऱ्या लोकांजवळून दंडाच्यारूपानें “घटी " या नामाचा एक कर, ह्मणजे विविक्षित ठरीव रक्कम घेऊन ते त्यांना सोडून देत असत. याच पद्धतीस पुढे "जझिया" (सजिया अथवा जीशिया ) है नांव प्राप्त झालें. श्रोडक्यांत ह्मणजे मुसलमान लोकांनी जे जे प्रदेश जिंकून आपल्या अमलाखाली आणिले,