Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नवीन कायदे घडविले, त्याठिकाणी तो राज्यकारभार करूं लागला; व आपल्या सैन्यास आसपासच्या प्रदेशांवर स्वाया करण्यास पाठवून तो लूट मिळवूं लागला. त्यावेळी , युद्धांत मिळविलेली लूट सर्वांनी सारखी वांटून घ्यावी," असा परमेश्वरी हुकूम आहे, अर्से त्यानें प्रसिद्ध केलें; त्यामुळे विजयाबरोबरच अनायास संवतीचाही फायदा मिळून शिवाय धर्मवृद्धिही होण्याची आशा व बहुतेक खात्री असल्यानें महंमदाचे अनुयायी मोठ्या उत्सुकतेनें व हुरूपानें युद्धे करूं लागले, व त्यामुळे महमंदाचा आत्मविश्वास व त्याचें सामर्थ्य इतकें वाढलें कीं, लवकरच त्याने आसपासच्या राज्यकर्त्यांना आपला धर्म स्वाँका- रण्यास सक्तीनें भाग पाडिलें आणि इराणचा बादशहा खभु दुसरा, कान्स्टांटिनोपल येथील बादशहा हेराक्लिअस इजिप्तचा राजा मोकाकाज आणि इथिओपियाचा राजा, वगैरे मंडळीकडे आपले वकील पाठवून आपण संस्थापित केलेला धर्म स्वीकारण्या विषयीं त्यांना विनंती केली; तेव्हां त्यांपैकी इराण देशाशिवायच्या इतर राज्यकर्त्यांनी महंमदाच्या पत्रांचा योग्य आदर केला परंतु इराणचा बादशदा खुश्रू ( ऊर्फ दुसरा खुशरू परव्हीज) यानें त्याच्या पत्राचा अनादर केला इतकेंच तर त्यानें तें पत्र फाडून टाकिलें, त्यामुळे महंमदास अतीशय राग आला, आणि “ इराणच्या ह्या उन्मत्त बादशहानें जसे माझ्या पत्राचे तुकडे तुकडे उडविले, त्याप्रमाणेच माझे धर्माभिमानी व शूर अनुयायी त्याच्या राज्याचे तुकडे तुकडे करून टाकितील" असे त्यानें उद्गार वढेले. महंमदा हे उद्गार त्याच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी खरे झाले आणि मुसलमानांनी तो देश जिंकून आपल्या ताब्यांत घेतला. ● महंमद हा मदीना येथील कारभार पाहूं लागून त्या ठिकाणी त्याचें वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित झाल्यानंतर त्यानें एक मोहें सैन्य तयार केले आणि मक्का शहरावर स्वारी करून तें शहर त्याने आपल्या हस्तगत करून घेतले. "काबा " दिरांतील सर्व मूर्तीचा विध्वंस उडविला, व त्याच ठिकाणी त्याने आपल्या नूतन धर्माची प्रार्थना सुरू केली. या काळाशसून काबा हे ठिकाण मुसलमान जनतेचें श्रेष्ठ प्रार्थना मंदीर, आणि जगां तील मुसलमान यात्रेकरूंचे श्रेष्ठ पवित्र स्थान बन. याकाळांत अरबस्थानच्या आजू- बाजूच्या प्रदेशांत ख्रिस्ति धर्नास ग्लानी आलेली होती, आणि त्यांतील राजकीय परिस्थितिकी बरीच घोटाळ्याची व अंदाधुंदीची झाली होती. ही संधी साधून महंमदानें आसपासच्या प्रदेशांवर आपलें वर्चस्व स्थापन केलें व आग्ल्या शूर सैन्यासह रोमन साम्राज्याच्या ताब्यांतील आशिया खंडातील प्रदेशांवर अनेक स्वान्या करून त्या बादशाहतीच्या ताब्यां- तील कित्येक प्रदेशही त्यानें हस्तगत करून आपल्या अमलाखाली आणिले; त्याप्रमाणेच अरबस्थानामध्ये या काळांत काहीं यहूदी लोक रहात असत, त्यांना महंमदानें इ० सन