Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. प्रास्ताविक माहिती. ( मागील भागावरून पुढे चालू. ) मागील भागांत प्राचीन कालापासून विजयानगरच्या हिंदू राज घराण्यांच्या अखेरीपर्यंतची हकीकत देऊन त्यांत मुसलमान लोकांच्या हिंदुस्थान देशावरील स्वाव्यांचा, व त्यांनी अनेक हिंदू राज्यांना नामशेष करून त्याठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचा उल्लेख आलेला आहे. तथापि हिंदुस्थानांतील दक्षिण महाराष्ट्रातील विजया- नगरचें राज्य आणि महाराष्ट्रांतील मराठ्यांचें राज्य, यांच्यामधील “मुसलमानी राज्यांचा काळ " हा एक सळंग साखळी जोडणारा मध्यवर्ती दुवा आहे, त्यामुळे, मोडककृत दक्षिगेतील मुसलमानी राज्यांचा इतिहास भाग तिसरा, याच्या प्रस्तावनेंत ह्मटल्या प्रमाणे- " दक्षिणेचा या काळाचा इतिहास फार महत्वाचा आहे; उत्तरहिंदुस्थानांत अटकेपासून किंबहुना काबूलपासून तो तहत कलकच्या पर्यंत मोंगलबादशाहांचा अंमल बसला होता; तसेंच राजपुताना, माळवा वगैरे सर्व मध्यहिंदुस्थान, गुजराध इत्यादि मुलखांतही मोंगल बादशाहांवा करडा अंमल बसला होता. दक्षिणेत स्वतंत्र अशा दुसऱ्या मुसलमान राजांचा अंमल होता; ह्मणून त्यांवरही मोंगल बादशाहांनी छाप बसवून त्यांजवर प्रथम खंडणी बसविली व मागाहून एकामागून एक अशी तीं राज्य खालसा करण्यास मोंगलांच्या प्रचंड सेना दक्षिणेत येऊं लागल्या. ज्यावेळी मोंगल बादशाही औरंगजेब बादशाहाच्या काळांत वैभवाच्या व सार्वभौमत्वाच्या कळसास पोहोंचली होती त्यावेळीं खुद औरंगजे- बाच्या हयातीतच मोंगलांच्या शक्तिस न जुमानितां मराठ्यांनी दक्षिणेत मराठी राज्याची स्थापना केली, याचें आश्चर्य वाटल्यावांचून कधींही रहात नाहीं; आणि मराठ्यांना एका- एकीं इतका जोर व उत्साह कशानें आला, व याची कारणे काय असावीं, हे विचार सहजीं मनांत आल्यावांचून रहात नाहीत. शिवाजी सारखा जरी महागुणवान् व प्रतापी पुरुष निपजला, तरी अर्ते अचाट कार्य सिद्धीस जाण्यास अनुकूल गोष्टी असल्याशिवाय त्याच्या गुणाचें, व प्रतापाचे चीज कधींही झाले नसतें; ह्मणून मराठ्यांना अनुकूळ अशा गोष्टी कसकशा घडत गेल्या व त्यांचा फायदा मराठ्यांना कसा मिळाला- दक्षिणेतील मुसलमानी राज्यांच्या इतिहासावरून समजून ये