Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) दक्षिणेत मुसलमानांचा अंमल स्थापित झाल्यापासून हयशी, इराणी, मोंगल, अफगाण वगैरे अनेक जातीचे मुसलमान परदेशांतून या राज्यांत येत व त्यांना ते राजे आपल्या फौजेंत नौकरीस ठेवांत; तरी दक्षिणेकडोल मराठेलोकांस आपल्या फौजेंत नौकरीस ठेविल्या- शिवाय त्यांचें चालत नसे; कारण त्यांचा चपलपणा, साधेपणा, व काटकपणा त्यांनी फार फायदेशीर होत असे. त्यामुळे त्यांच्या फौजेंत मराठ्यांची जास्त जास्त भरती होत गेली; व पुढें जेदां मुसलमान राजांमध्येच आपापसांत एकसारख्या लढाया सुरू झाल्या तेव्हां तर त्यांच्या सैन्यांत मराठ्यांची अतीशयच भरती होत चालली; या मुसलमान राजांच्या पदरीं जे “ बर्गीस्वार " ह्मणून असत, से तर बहुतेक मराठे हेच असत; आणि अल्पकाळांत मोठमोठ्या दौडी करून एकाएकीं शत्रूवर छापे घालण्यांस, त्यांची रसद बंद करण्यास, कही कबाड मारण्यास ( लणजे शत्रूची रसद लुटून आणण्यास ) त्यांचा फारच उपयोग होत असे. CL अशा रीतीनें दक्षिणेतील मराठे व मावळे, यांना या मुसलमानी राजांच्या लष्करति नौकन्या मिळत गेल्याने त्यांनां आयतीच युद्धकला येत जाऊन ते दिवसेंदिवस युद्धनिपुण बनत चालले; पुढे जसजसें या राजाँचें राज्य वाढत चाललें तसतसे ते व त्यांचे जातभाई ऐषारामी बनत जाऊन, मराठे व मावळे लोकांवर युद्धाचें काम अधिक अधिक पडत चाललें ऐशरामाचें सहकारी आलस्य वाढत जाऊन वजीर, सुभेदार, वगैरे मोठे मुत्सद्दीपणाचे व महत्वाचे अधिकारही मराठ्यांना देण्याचा कित्येक ठिकाणी प्रसंग येऊं लागला व त्यामुळे मराठ्यांच्या आंगीं स्वाभाविकरित्याच राज्य चालविण्याची पात्रता दिवसेंदिवस वाढत गेली बाकी गोटी मुसलमान कारकीदने स्वाभाविकच अनुकूल केल्या होत्या. गोब्राह्मणाचा वध व छल करणे, हिंदू लोकांनां बाटविणे, त्यांची देवळें भ्रष्ट करणें व पाडणें बगैरे गोष्टी सतत चालल्यामुळे दुलोकांची मने दूषित होऊन कोणी पुढारी मिळाल्यास मुसलमानांचा प्रतिकार करण्याची त्यांची तयारी होती, त्यामुळे जेव्हा जेव्हा मुसलमान राजांच्या दरबारात ऐषाराम व त्याबरोबरच आळस वाढत गेला त्यावेळी एखाया घरभेद्या प्रमाणे मराठ्यांना त्यांची खरी स्थिती समजली; आणि अखेर शहाजहान बादशहाची फौज व त्याचे मोठमोठे सरदार यांनी अहंमदनगर खालसा करून त्या ठिकाणी मोंगली अंमल स्थापिला असता शिवाजीचा बाप शहाजी यानें स्वपराक्रमानें मोंगलाकडून काहीं प्रदेश जिंकून घेऊन नवीन राजा स्थापन करून काही दिवस निजामशाहीची पुन्हां स्थापना केली, तेव्हा त्याचा गुगवान, धाडसी व शूर पुत्र जो शिवाजी त्यास धीर येऊन या सर्व स्थितीचा सदुपयोग करून घ्यावा, व स्वराज्याची स्थापना करावी, व ती स्थापना करण्यास लोकांस ईर्ष्या व स्फुरण आणण्यास गोब्राह्मणाचे रक्षण करणे व हिंदूधनांची स्थापना करणे हाच उद्देश आहे असे प्रसिद्ध .