Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(:२६) et "" - है उच्च नीतितत्व त्यास आठवलें! त्याच्या पापी कृत्यांची भूर्ते घोहोंकडून त्याला छछूं लागली, तेव्हा आपण खरोखरीच अघोर रुत्यें केलीं आहेत, अशी त्याची खात्री झाली; " माझें ढें कसें होईल ?" अशी त्याला काळजी वाटू लागली; आणि " इंश्वरासन्निध मला कोणकोणत्या दुःसह शिक्षा व यातना भोगाव्या लागतील, " व माझ्याकडून की अक्षम्य पातकें व सत्यें घडली आहेत, त्यांचल ईश्वर तरी मला कशी क्षमा करील," अशी त्यास भीति वाटू लागली. साधारण मनुष्यसुद्धा कितीही अधोगतीस गेलेला असला तरी आणि त्याचा स्वभाव कितीही कठोर बनला असला तरी त्याच्या अंतःकरणांत नेहमीं जागृत असणान्या दुष्ट मनोवृत्तींवर निदान मरतांना तरी सद्सद्विवेकबुद्धांचा दाब निःसंशय बसलाच पाहिजे, हा मानवी सृष्टोचा नियम आहे; मानवी विश्वाची घडामोड करण्यांत परमेश्वराचें मूर्तिमंत अस्तित्व भासविणान्या अनेक चमत्कारपैकी हा एक जिवंत व जागता चमत्कार आहे; अर्थात औरंगझेबासारख्या असामान्य विद्वान पुरुषास हा नियम माहीत असलाच पाहिजे, हे उघड आहे; आणि ह्मणूनच त्याच्या भीषण कृत्याचे महाभीषण स्वरूप त्याच्या डोळ्यांपुढे उभे राहून मृत्यूच्या वेळींही त्याला घोर यातना भोगाभ्या लागल्या व अशाच स्थितीत प्राण घुटमळत घुटमळत या महानू राज्यकर्त्याच्या इहलोकांच्या कष्टमय जीवनयात्रेचा अत्यंत दुःखदायक शेवट झाला !! अवरंगझेबाचा ज्याप्रमाणे कोणावर विश्वास नव्हता त्याप्रमाणेच त्याच्यावरही कोणी विश्वास ठेवीत नव्हतें, एखादा अत्यंत विषारी, एकाच लहरींत प्राण घेणारा काळा मांग ज्याप्रमाणे एकदम चटकन उलटून दंश करितो, त्याप्रमाणेच अवरंगझेबाचें आचरण होतें; न्यायाच्या व नीतीच्या आचरणामुळे उत्पन्न होणारे मनोधैर्य त्याच्याठायीं वसत मध्हतें; सदाचरणामुळे मनाला होणारा आनंद त्याच्या नशीब नव्हता; बुद्धिमलिन मन, रक्तमलिन ढात, व दुष्कृतिमलिन देह यांचा मानची चारित्र्याच्या असुरी उन्मादाचा, अढळ मनोवृत्तीचा व अमेय अशा अहंकाराचा, औरंगझेच हा एक मूर्तिमंत पुतळा होता; महत्वाकांक्षेने झपाट- लेला मानवी देह-देहाची ओली माती-जमीनीवर पडेपर्यंत किती परमावधीच्या अधोगतीप्रत जाते, याचे हे एक ठळक उदाहरण होतें; अवरंगझेबानें केलेली अनेक युद्धे आवश्यक ह्मणून नव्हे तर स्वार्थाने प्रेरित होऊन मुद्दाम आपणहून आगळिकीनें केलेलीं होतीं; राज्यांत व राज्याचाहेर त्याला अनेक शत्रू उत्पन्न झाले होते; त्याच्या जिवंतपणींच टीप १: – “ St Augustine, looking out from his City of god over the still vast domain of Rome debates the quesion whether it is fitting for good men to rejoice in