Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांची कुटिल कारस्थानांची सारखी सुधारून वाढविलेली आवृत्ति काढीत राहण्यास्या संबईनें पुढें पुढे त्याचें मन इतकें निगरगट्ट बनून गेलें कीं, आपली फूत्येंच मुळीं अघोर आहेत कीं नाहींत, याची सुद्धां त्याला शंका वाटू लागली | अती लोमी व स्वार्थी स्वभावामुळे त्याची विवेकबुद्धि नष्ट झाली ! आपल्या भाऊबंदांचे गळे कांपितांना त्याचें मन कचरलें नाहीं; भायातदायादांना नामशेष करितांना त्याला खंत वाटली नाहीं; स्वकीयांच्या गळ्याची तांत बाहेर ओढून काढितांना त्याला द्रव आला नाहीं; अफगाण लोकांच्या कत्तली उडवितांना त्याला पाझर फुटला नाहीं; रजपुतांना नामशेष करण्याच्या लहरींत आपल्या कृत्यांच्या भावी परिणामाबद्दल त्याच्या मनांत विचार आला नाही; मराठ्यांना चिरडण्याकरितां केलेल्या खटपटीत आपल्या अन्यायी, अविवेकी दानतीचा काय परिणाम होईल, है मनांत आणण्याची त्यानें पर्वा केली नाहीं; पण मरतांना मात्र “ महत्वाकांक्षेच्या धुराइतकी दुसरी कोणतीही हवा रोगकारक, व सर्वस्व नाशकारक नाहीं." अज्जमशहा व कामबक्ष या आपल्या तीन मुलांना वांटून दिले होतें, आणि औरंगझेबाच्या मृत्युसमयीं, दक्षिणचें राज्य कामचलात मिळावे ह्मणून उदेपुरीनेही पुष्कळ खटपट केली होती; परंतु अवरंगझेच मृत्यूपावल्याबरोबर मुअज्जम हा काबूलच्या सुभ्यावर होता-हा ताबडतोच मोठ्या झपाट्यानें दिल्लीकडे आला; इकडून अज्जमशहाही त्याच्यावर चालकरून गेला, व जाजव येथें युद्ध होऊन त्यांत अज्जमशहा व त्याचे दोन्ही मुलगे मारले गेले; व मुअज्जम हा बहादूरशहा हा किताच धारणकरून बादशाहीपदावर आरूढ झाला; परंतु है त्याचें कृत्य कामचक्ष यास आवडलें नाहीं, ह्मणून बहादूरशहा त्याच्यावर दक्षिणेत चाल करून आला, हेद्राचादनजीक उभयतांची लढाई होऊन तीत कामचा मारला गेला, ( ता० १४ फेब्रुवारी १७०८) व बहादूरशहा सर्व राज्याचा मालक झाला. - टीप १: - शहाजहान यानेंही असाच आपल्या सर्व प्रतिस्पयचा निकाल विला; आणि शहर खुश्रूचे दोन मुलगे, दावरबक्ष व गर्सास्प, आणि दानियलचे दोन मुलगे तमुरास, व होशंग, या पांच दुर्दैवी राजपुत्रांचा वध करून तो ता० ५ फेब्रुवारी ३० सन १६२८ रोजीं गादीवर आला; शहाजहान व औरंगझेब यांचं हे वर्तन परस्पर एकसारखे आहे; परंतु त्या उभयतांचा पुढील वर्तनक्रम मात्र अगदींच भिन्न व विरुद्ध दिशेचा आहे; आणि त्यामुळेच शहाजहानची कारकीर्द यशस्वी झाली, आणि औरंगझेबाच्या प्रत्येक राजकारणाचा बोजवारा होऊन त्याच्या चिंध्या सर्वभर उडत राहिल्या, है या उभयतांच्या आयुष्यक्रमांमधील वैशिष्य आहे.