Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" अखेरच्या वेळी आपल्या दुष्ट रुतीबद्दल किती पश्चात्ताप झाला होता व त्याची पा त्याच्यापुढे उभी राहून, त्यामुळे त्याच्या अंतःकरणाची कशी कालवाकालव होत होती, व परस्थ झणूनच जाणार ! मी कोण, व कशाकरितां जन्मास आलों, आणि माझ्या प्रारब्धी काय लिहून ठेविलें होतें, हे मला कांहींच माहीत नाहीं ! जो क्षण सुखांत गेला त्याने आपल्या पाश्चात् दुःखमात्र राखून ठेविलें | मी माझ्या राज्याचा संरक्षकही झालों नाहीं; आणि पालकही झालों नाहीं. माझें बहुमोल आयुष्य व्यर्थ गेलें ! मला जसजशी बुद्धी होई तसतसें मी करीत गेलों. माझ्या अंतःकरणास सद्सद्बुद्धीनें जशी जशी प्रेरणा करावी तसा तसा मी वागत असे. माझ्यामध्यें सदसाईचारशकि नव्हती असें नाहीं. परंतु तिचा कडक प्रकाश माझ्या धुंद दृष्टीने मला दिसला नाहीं. आयुष्याची शाश्वति नाहीं, हैं माझ्या मनांत मी वागविलें नाहीं गेलेला श्वास परत येत नाहीं; आणि त्यामुळे पुढे माझ्या शाश्वत कल्याणाची मला आशा नाहीं ! माझे शारिरीत जो ज्वर असे तो निघाला आहे; व आतां तरी पुढे माझ्या अस्थि आणि चर्म हींच काय तीं अवशिष्ट रहावयाची आहेत. प्रिय पुत्र कामचक्ष हा जरी विजापूरकडे गेला आहे तरी तो माझ्या जवळच आहे, आणि माझे पुत्रा ! तूं तर त्याच्याहून अगदींच जवळ आहेस. परंतु प्रिय शहाअलम मात्र फार दूर आहे. माझा प्रिय नातू ( मूअज्जमचा धाकटा मुलगा अजीम-उदशान ) हा ईश्वरी रूपेनें हिंदुस्थानाजवळ येऊन पोहोचला आहे. आपली फौजफांटा आणि बाजारबुणगे हीं आतां माझ्या प्रमाणेच त्रासून निराधार आणि निःशस्त्र झाल्यासारखी होतील; व त्यांच्याही जीवास माझ्या प्रमाणेच शांती आणि समाधान यांचा अभाव होऊन, त्यांच्या जीविताची, पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे, किंवा आरशाच्या मागच्या कल्हईसारखी, शाश्वति नाहीं, है ठरलेलेच आहे. त्यांचा राजा मी, नाहींसा झाल्यानंतर त्यांना कोणी धनी किंवा पोशिंदा मिळेल किंवा नाहीं, है त्या विचान्यांस मुळींच माहीत नाहीं ? मी या जगावर कांहीं एक बरोबर आणिलें नाहीं; आणि आता या जगतून जातांना मनुष्याचे ठायीं असणारी प्रत्येक गोष्टीची अशाश्वती व अनिय मितता, ह्रीं मात्र मी बरोबर नेत आहे. मला मुक्ति कशी मिळेल याची मला अत्यंत भीति बाटत आहे; आणि ईश्वराचे सन्निध मला कोणकोणत्या दुःसह शिक्षा व यातना भोगाव्या लागतील त्या कोणास माहीत ? ईश्वर हा कृपाळू आणि दयानिधि आहे, है मला पूर्णपणें माहीत आहे, व त्याच्यावर माझा दृढ भरंवसा आहे; परंतु माझ्या कडून जीं अघोर अक्षम्य पातकें व रुःयें घडलीं आहेत, त्यांबद्दल त्या रुपाळू ट्र्यासागर परत्माम्यानें मजवर आपली प्रेमदृष्ठि कशी ठेवावी, हे मला समजत नाहीं; आणि त्यामुळे माझें चित भौतिग्रस्त झालें आहे ! माझें प्राणोत्क्रमण झाल्यावर माझे पश्चात् माझें प्रतिबिंद ५