Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २० ) स्वार्थ साधितांना व साधण्याकरितां नीतिपत्ता गुंडाळून ठेवण्याची व ठेवीत राहण्याची संवय, प्रत्येकावर अविश्वास, स्वधर्मीय विजापूर व गोवळकोंर्डे येथील त्यास प्रसंगी मदतगार होऊं शकणाच्या राज्यांचा अन्यायानें अपहार, इमानाच्या व सचोटीच्या वर्तनाचा अभाव, धर्मवेडेपणामुळे आपल्या प्रजेची गांजणूक व धार्मिक दुरा महामुळे इतरांना त्रास, स्थानिक संस्थांचा नायनाट अवजड अधिकारी सत्तेचें एकीकरण, प्रत्येक काम स्वतः करावयाचें या पद्धतीमुळे इतरांच्या कर्तृत्वशक्कोस पुढे येण्यास वाव न मिळून त्यामुळे राज्यावर घडलेला अनिष्ट परिणाम वगैरे कारणामुळे या महायुद्धीवान, पराक्रमी, शूर, कर्तबगार, करारी, विद्वान, हिंमती व हिकमती राज्यकर्त्यांचा शेवट अत्यंत दुःखदायक झाला ? आपल्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत त्याने आपण होऊन आपल्या राज्याचा नाश करून घेतला; आणि त्याच्या मृत्यूनंतर लवकरच ही मोगल साम्राज्याची इमारत मूळावर बसलेल्या एकाच जोराच्या फटकान्याने धडाडून खाली येऊन नामशेष झाली ? ? अवरंगझेचानें आपल्या आयुष्यांत जी अनेक घोर रुत्वें केलीं, तीं मृत्यूपूर्वी त्याला सारखी टॉचीत होती, त्याचें मन त्याला सारखें खात होतें, इह लोकींची निराशा व परलोकाची भांति, या दुधारी कातरींत त्याचा देह जिवंतपणी कापला जात होता; पितृहत्या, भ्रातृहत्या, पुत्रहत्या, स्वकीयांचा व परकीयांचा नाश वगेरे दुष्कृत्यांचीं भूर्ते त्याच्या डोळयासमोर नाचू लागली होतीं, आपण शहाजहान याच्याशी जसे वागलों तशींच आपलीं मुंलें आवल्याशीं वागतील अशी त्यास भौति होती; ह्मणून आपल्या मृत्यूसमयीही त्याला आपले मुलने जाळ नको होते; व चोहोकडूनच त्याची स्थिती यावेळी अत्यंत कष्टमय झाली होती; आपल्या मार्गे राज्यप्राप्तीकरिता आपली मुलें बादशाही डोलान्याभोंवतीं नंग्या तरवारीच्या खड्या तालांत “हायदोस " चा धुडगुस घालतील, असें त्यास वाटत होतें; स्वतःच्या चौदा भावंडापैकी आता तो एकटाच जिवंत राहिला होता; त्याच्या मृत्यूच्यापूर्वी एकच वर्ष लणजे इ० सन १७०६ मध्ये मुलगी गोहर-आरा, इतर मुली, पुतणे, नातू वगैरे त्याच्यादेखत मृत्युमुखी पडलेले होते; आणि दुःखांत व यातनांत त्याचा जीव सारखा घुटमळत होता | यावेळी त्यानें आपल्या दोनमुलांनां - अज्जमशहा व क्रामचक्ष यांनां, जी पत्र लिहिली ती अत्यंत हृदयद्रावक आहेत, व त्यांवरून औरंगझेघास ( १ ) अवरंगझेबानें अज्ज्मशहास पाठविलेले पत्रः- -- “ चिरंजीव शहा अज्ज्मशहा यास:- आशर्वाद माझें अंतःकरण तुझ्याकडे आहे. मला तर वृद्धावस्था प्राप्त होऊन, अशकतेनें ग्रस्त केले आहे. माझ्या सर्व अवयवांतील एकंदर शक्ति नष्ट झाली. मी या जगांत जसा एकटाच परस्थ ह्मणून आलों तसा एकटाच