Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ( १९ ) , गोष्ट तो स्वतः करीत होता; मराठ्यांचर त्यानें सतत सतरा वर्षे मोठ्या अट्टाहासानें मोहीम चालविली, त्यावेळीं तो वृद्ध होता, तरीसुद्धां तरुण मनुष्याप्रमाणेच त्याचा उत्साह, तडफ, तरतरी व चापल्य कायम होतें, या वयांतही तो सारखी मेहनत करीत होता; मराठ्यांना नेस्तनाबूद करण्याकरितां सारखा झटन होता; प्रत्येक गोष्ट स्वतः होसेनें करीत होता; कितीही संकटे आली, आपत्ती कोसळल्या, कितीही लोक अथवा जनावरें मेलीं, दुष्काळ पडला, पटकीची सांथ आली, पावसाने नद्यांस पूर येऊन माणसें- जनावरें, वाढून गेलीं, अन्नाचा दुष्काळ पडला, तरीही तो तिळमात्रही डगमगला नाहीं; मानवी आपत्तींची तर तो केव्हाही पर्वा करणारा नव्हताच, पण दैवी आपत्तींमुळेही त्याचा धैर्यमेह केव्हाही यकिंचित सुद्धां डळमळत नव्हता; काळाला बगल देऊन एकीकडे होण्यापेक्षा काळाशी झगडून आपला मार्ग काढण्याच्या अट्टाहासांत तो नेहमीं मन रहात होता; इतका तो कल्पनातिन धैर्याचा होता; दुगडी काळजाचा व मनाचा होता; प्रत्येक आपत्तीबरोबर त्याला दुपट हिंमत चढत होती; लढाईचे कार्यक्रम व नकाशे तो स्वतः करीत होता, स्वतः लढाईची व सर्व राज्याची व्यवस्था पहात होता. डोच्याला चष्मा न लावितां स्वतः राज्याचें काम करीत होता, आणि त्याच्या स्वदस्तूरच्या हुकुमाशिवाय राज्यांतील काडीही हलत नव्हती, असा हा अलौकीक पुरुष असूनही त्याच्या कोणत्याच सद्गाचें चीज झालें नाहीं, ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे पण त्याला कारणीभूतही स्वतः तोच आहे. तो असामान्य बुद्धिवैभवाचा पुरूष असूनही “ अती शहाण " असल्यानें त्याच्या सर्व अलौकिक गुणांचे मातेरै झालें । दुष्ट वासना, अन्यायी कृती, दुसन्याचे नुकसान करण्याची पापी इच्छा, आणि स्वकीय परकीय हा भेदभाव न करितां सर्वांना छळीत राहण्याची प्रवृत्ति, यामुळें त्याच्यापासून कोणाला सूख झाले नाहीं, आणि सर्व जन्मांत " समाधान " या चार अक्षरांचे चार प्रहरही त्याचे समाधानांत न गेल्यामुळे त्याला स्वतःलाही कधीं सूख लाग नाहीं. काळजी, कांक्षा आणि कष्ट या तापत्रयांत त्याचा जन्म गेला; आपण करतों है अयोग्य आहे, हे त्यास माहीत असूनही तशाच गोष्टी मुद्दाम पुन्हा पुन्हां उघड्या डोळ्यानें करीत राहण्याचा त्याचा स्वभाव बनला; तळहाताने झांकल्या जाणाऱ्या टाळूच्या आंतील टीचभर मेंदूत, सर्व मांगली साम्राज्य, मराठे, रजपूत व अफगाण, या सर्व व इतर विचारांचे विश्व सहज सांठवून ठेवण्या इतका अवरंगझेच बुद्धिप्रभावाचा असून सुद्धा त्याच्या कृतीमुळे त्या बुद्धीप्रभावापासून कोणास फायदा न होता उलट चटके बसले ! थोडक्यांत ह्मणजे, मराठे, रजपूत, व अफगाण, यांच्या बरोबरील अवरंगझेबाची वागणूक-कुटिल राजनीति, जुलमी व दुराग्रही स्वभाव, अविचारी व इट्टी वर्तन, स्वार्थी व कावेबाज वागणूक विश्वासघातकी व तिरस्करणीव आचरण,