Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(( १८ ) काय ! तुह्मी, माझे वडील शहाजहान बादशहा यांच्या जवळ एकदां असें ह्मणाला होता कीं, "मी औरंगझेबाला तत्वज्ञान शिकवीन " आणि मला स्मरतें कीं तुझी मला पुष्कळवर्षे पर्येत, आकाश, ब्रह्म, घटपट, इत्यादि निरस शद्धांनी काहीं विषय समजून देण्याची खटपट करीत होतां व ती माझ्या मनांत उतरण्याकरितां मी त्याविषयांत माझें डोकें गुंतवीत होतों. पण मला माझ्या उपयुक्त ज्ञानदत्वास आणि माझ्या राज्यकर्तृत्वास हितमद असें ह्मणण्यासारखा मला त्या विषयापासून काय लाभ झाला ? तुझी जी काय अवजड व उच्चारण्यासहि कटोण अशीं नांवें घेत होता तेवढीं यात्र कायतीं तुमच्या नेहमीं उच्चारण्याने माझ्या ध्यानांत राहिली; परंतु त्यांच्यासंबंधानें विवेचन किंवा ती समजूत . मी तेव्हांच विसरून जात असे, हे तुलांस समजत नव्हतें काय ? आणि तें विवेचन किंवा ती समजूत माझ्या ध्यानांत राहून तरी मला त्यांचा आज कितीसा उपयोग झाला असता ? अशा रीतीनें तुलो माझ्या कोवळ्या बुद्धीचा आणि तीक्ष्ण स्मृति शक्तीचा दुर्व्यय नाहीं का केला ! असे भलभलते व तुमच्या मतार्ने महत्वाचे विषय मला समजून देण्यांत तुझीं इतका मात्र फायदा करून घेतला की, त्यांच्या योगानें आह्मां सारख्या मूढ व अज्ञान्यास, तुझी ह्मणजे सर्वज्ञ, सर्वशास्त्र पारंगत, आणि अत्यंत पूज्यगुरुवर्य आहांत असा निरर्थक भ्रम उत्पन्न करून, तुझाला आपलें आह्मांवरील वजन मात्र बरेच दिवस कायम ठेवितां आलें. तुमन्यामध्यें, राजेलोकांची व्यर्थ स्तुती, हांजी हांजी, आणि सत्यापलप हे गूण मात्र पूर्णपणे वसले आहेत. तुह्मांला माझ्या दरबारांत मी एक उमराव करावें, अशी जी तुमची इच्छा आहे ती मी तुमच्या कोणत्या गुणावर लुब्ध होऊन पूर्ण करावा ? तुह्मी मला लष्करी, व्यावहारिक, किंवा राजकीय शिक्षणापैकी कोणतें शिक्षण दिलें आहे ह्मणून मी तुलांस मान देऊं ? ह्या आवश्यक ज्ञानामध्यें जर तुझी मला पारंगत केलें असतें तर मी तुमचा अत्यंत आभारी, व ऋणी होऊन, ज्याप्रमाणें शिकंदर बादशहा, महाविद्वान आरिस्टाटलू या आपल्या परमपूज्य गुरुवर्यावर निष्ठा व भाव ठेवून त्याला मानीत होता, त्याप्रमाणेच मीही तुझांस मानिलें असतें. परंतु तशा प्रकारचें उपयुक्त शिक्षण आणि उपयुक्त विद्या तुलांकडून मला कांहींच मिळाल्या नाहीत, व त्यामुळेच तुमच्याविषयी माझ्या मनति आदर अथवा पूज्यभाव मुळींच उत्पन्न होत नाहीं. तुझी आलांत तसेच चालते व्हा, आणि आपल्या गांवढ्यागांवांत स्वस्थपर्णे देवाचे नांव घेत पुढील आयुष्याचे दिवस कंठित रहा. माझ्या दरबारात, तुझी प्रविष्ट होऊन, "तुझी कोण, " हें देखील कोणास समजूं देऊं नये, अशी माझी इच्छा आहे. " वरील पत्रावरून औरंगझेयाची विद्वत्ता व बुद्धिमत्ता हीं पूर्णपणे निदर्शनास येतात, अवरंगझेब हा एक अलौकिक राज्यकर्ता होता, यांत तर काहींच संदेह नाहीं; प्रत्येक