Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५ ) तेव्हा त्यास अतीशय वाईट वाटलें; सलीमच्या या कठोर वर्तनाचा त्याला अतीशय राग आला; आणि मोठ्या उद्वेगानें व कळवळ्यानें तो ह्मणालाः – “ अरे, मी नुसती मुंगीसुद्धां चिरडण्यास भितों; मेलेल्या बकऱ्याचीसुद्धां चामडी सोलण्यास मला धीर होत नाही, आणि प्रत्यक्ष या माझ्या पोटच्याच मुलानें जिवंत मनुष्यांची अशी दशा करावी !! " 2 मोंगली राज्याच्या इतिहासांत निःसीम पुत्रप्रेम व उज्वल पितृभक्ति, याचे फक्त एकच उदाहरण आहे; ह्मणजे बाबर व हुमायुन यांचें होय; बाघर यार्ने हुमायूनच्या जिवावरून आपला जीव ओवाळून टाकिला, आणि हुमायुननें अनेक प्रकारचे हाल, संकटें, आपत्ती, व वनवास भोगीत राहून वडिलांच्या आज्ञेवरून आपला जीव ओवाळून टाकून आपल्या पितृभक्तीची तोडीस तोड केली ! हुमायूनचा मुलगा अकबर हा हुमायूनच्या मृत्युमुळें तेरा वर्षे तीन महिन्यांचा असतांनाच गादीवर आला; तथापि हुमायूनचा प्रेमळ स्वभाव व त्याचें अकचरावरील अगाध प्रेम आणि उलटपक्षी अकबराचा थोर व दिलदार स्वभाव आणि अखेरपर्यंत त्यानें आपल्या सख्ख्या इतकेंच नव्हे तर सावत्र मातांच्या सुद्धा आज्ञा कधीही उल्लंघन केल्या नाहीत असा वडील मनुष्यांना पूज्य समजून मान देत राहण्याचा स्वभाव, यावरून बाबर, हुमायून याप्रमाणेच हुमायून व अकचर है दुसरे उदाहरण झालें असतें असें ह्मणण्यास हरकत नाहीं; पण त्यानंतरची परंपरा मात्र अगदींच निराळी आहे; सलीम बंडखोर निघून इ० सन १६०१ मध्यें अकबराशी युद्धही करण्याकरितां तो अलाहाबादेहून निघाला होताः तीच स्थिती पुढे सलीम-जहांगीर च्या कारकीर्दीत पुन्हां उत्पन्न झाली ? जहांगीर विरुद्ध त्याचा मुलगा खुर्रम-भावी शहाजहान यानें बंड केले; परंतु त्यांत त्यास यश न आल्यामुळे तो पळून उदेपूरकर राजा कर्ण याच्याकडे आश्रय मागण्यास गेला; त्यावेळी त्यानें आपलें पागोटें व ढाल काढून राण्यापुढे ठेविली आणि गुढघ्यावर बसून त्यानें कर्ण राजास विनंती केली की, आता माझी अब्रू राखून माझें रक्षण करणें तुमचेकडे आहे. " त्याबरोबर राण्यानें आपल्या डोक्याचें पागोटे काढून खुर्रमच्या डोक्यावर ठेविलें व त्यानें पुढे काढून ठेविलेलें पागोटें आपल्या डोक्यावर घातलें. व अशा रीतीने राजा कर्ण यानें खुर्रमच्या संरक्षणाविषयीं त्यास पूर्ण अभ्यासन दिलें. व त्याची इतकी बरदास्त ठेविली की तोही त्याठिकाणीं ( उदेपूर येथें ) घरच्याप्रमाणे राहिला; राजा कर्ण यानें त्यास आपल्या एका राजवाड्यांतच जागा दिली होती; व नंतर खुर्रम यानें आपणांस राहण्याकरितां उदेपूर येथेंच पुष्कळ संपत्ती खर्च करून एक घुमटाची इमारत बांधिली; व मुसलमानी रिवाजा प्रमाणें त्या घुमटावर अर्धचंद्राकृतीचें निशाण फड़कत देविलें; सुरंभ यानें त्या इमारतीच्या