Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४ ) नष्ट करून टाकिज़ी ! संगाच्या मागून त्याचा मुलगा रत्न हा गादीवर आला; ( इ. सन १५३०) तोही संगाप्रमाणेच अतीशय शूर, अभिमानी, साहसी व पराक्रमी होता; आणि बाबरनें नुकत्याच स्थापन केलेल्या राज्यास तो एक जबरदस्त प्रतिस्पर्धी बनला असता, पण आपसांतील स्पर्धेत एका द्वंद्वयुद्धांत तो मारला जाऊन मोंगली राज्यावरील है गंडांतर आपोपाप परभारच नाहींतें झालें; व त्यानंतर मोंगली सत्तेशीं वर्चस्वप्रातीकरितां झगडणारा कोणीही बलिष्ट प्रतिस्पर्धीन राहून मोंगल साम्राज्याची मोठ्या झपाट्याने वाढ होत गेली. बादशहा अकचर याच्या कारकीर्दीपासून मोंगली साम्राज्य अत्यंत वैभवसंपन्न होत गेलें; अकबराची गणना जगांतील श्रेष्ठ राज्यकत्यामध्ये होते, इतका तो अलौकिक राज्यकर्ता होऊन गेला यांत काहीही संशय नाहीं; तथापि तरुण वयांत त्यांचे आचरण कित्येक प्रसंगी कुपणाचें होतें; एके दिवशीं रात्रीं तो नेहमीच्यापेक्षां लवकर निजावयास गेला असतां महालाचा बत्तीवाला झोपी गेलेला त्यास आढळला, या क्षुल्लक अपराधाबद्दल त्यानें त्याचा कडेलोट केला; आपल्या कर्तव्यांत चुकलेल्या पहारेक-यांचा छळ करणे; दोन हजार लोकांची डोकों कापवून त्यांचे ढीग रचविणे, अश क्रूर कृत्यें अकबराने केलेली आहेत; आणि चितोड काबीज केल्यानंतर त्यानें केलेली कत्तल व इतर अनन्वित प्रकार हे दुर्दैवाने त्याच्या थोर नांवास कमीपणा आणणारे आहेत; तथापि पुढील वयांत त्याचा स्वभाव अतीशय दयाळू व प्रेमळ होत गेला, चितोड येथील संहारामुळे त्याच्या मनाला चटका बसला व त्या पापाचे झालन करण्याकरितां तो अजमीर येथें मैमुद्दीन चिस्ती ह्मणून एक साधू होऊन गेला, त्या पिराच्या दर्शनास पायीं चालत गेला; आणि उत्तर वयांत तर त्याचा स्वभाव इतका कोंवळा बनला कीं, राजपुत्र सलीम - भावी जहांगीर-याने, अलाहाबाद येथे अत्यंत व्यसनाधीन झाल्यावर त्याच्या एका कारकुनानें नोकरीचा राजीनामा दिला, ह्मणून त्यास त्यानें जिवंत सोलविलें, आणि त्याच्या दोघांसोबत्यांचे हातपाय तोडून जीव घेतले, ही गोष्ट अकबरास कळली टीपः—चितोड येथील संहारांत जे रजपूत वीर मृत्यू पावले, त्यांचीं जानवीं अकचरानें वजन करून पाहिली ती ७४॥ मण ( साडे चोन्याहत्तर मण, कच्चा, ४ - शेर = १ मण ) भरली. हिंदुस्थानांतील सर्व टुँडिवाले व सराफ आपल्या वह्यांवर व पत्रांवर हल्लींही ७४॥ हा आंकडा घालीत असतात; त्याचे कारण असे कीं, कोणी अक्षर बदलील अथवा पत्र, फोडील तर त्यास वरील वजनां इतकीं जानवरों घालणाऱ्या लोकांच्या वधाचें पाप लागेल अशी त्यांची शपथ आहे, असे समजावें. या खुर्णेत " चितोड मान्या को पाप 3₁ असे ह्मणतात.