Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३ ) विषयी काहीही भीति बाळगूं नका; मी तुमच्या मदतीस येत आहे" असा उलट निरोप पाठवून तो चितोड येथे गेला, तें शहर हस्तगत करून घेतलें, व त्याच्या राजधानीस ह्मणजे मांडवगडास शह देऊन विक्रमादित्याची चितोडच्या गादीवर स्थापना केली. बादशहा बाचर हा मोठा धोरणी, दिलदार, व परिस्थितीचें योग्य आकलन करून त्यानमाणे वागणारा राज्यकर्ता होऊन गेला; त्यानें आपला मुलगा हुमावून यास जो राज्याच्या मजयुती करितां अमोल्य उपदेश केला त्यावरूच त्याची अलौकिक योग्यता निदर्शनाश येते; चाचरच्या मृत्यूनंतर हुमायून गादीवर आला आणि त्यास पदभ्रष्ट होऊन जरी तेरा वर्षे - ३० सन १५४० १५५३ पर्यंत - वनवास भोगावे लागले तरी, उपरीनिर्दिष्ट राणी कर्णावती हिच्या उदाहरणावरून, व त्याच्या अल्पकारकीरातील इतर गोष्टींवरून तोही मोठा विद्वान, विचारी, व नमुनेदार राज्यकर्ता होऊन गेला असेंच दृष्टोत्पत्तीस येतें. तथापि बाबर यानें हिंदुस्थानांत जें आपलें राज्य स्थापन केले, आणि फत्तेपूरशिक्री येथें संगराण्यावर जो विजय मिळविला त्याला बाचरची कर्तबगारी हैं तर कारण प्रमुखत्वानें आहेच; पण त्याशिवायची कारणेही विचारांत घेणे आवश्यक आहे. संगाने एकदम तडकाफडकी बाबरच्या सैन्यावर हल्ला केला असता, तर या युद्धाचा परिणाम झाला त्याहून निराळा झाला असता, असे मानण्यास आधार आहे; त्याप्रमाणें रायसीनचा राज्यकर्ता सिलौदी हा नालायक मध्यस्थ निवडण्यांत चूक झालीं; व प्रकरण अधिक चिपळत गेलें; शिवाय हा घातकी मनुष्य गोटांत फितूरी असून वरकरणीं एक- निष्ठेचें कातडें पांघरून वावरत होता, तो ऐनवेळीं संगाकडून निघून बाचर यास जाऊन मिळाला; व त्यामुळे संगराणा विजयी होण्याचा रंग दिसत होता तो साफ बदलून जाऊन त्यास माधार घेणे भाग पडलें ? काळ नष्ट आला; शिलौदीच्या रूपानें जयचंदाचा अवतार पुन्हां निर्माण झाला; आणि स्वकीयांचा द्रोह करून हिंदूंपदचादशाही होण्याची आशा समूळ " मुलगा प्रसिद्ध अकबर, त्याचा पुत्र जहांगीर, जहांगीरचा मुलगा शहाजहान, आणि शहाजहानचा मुलगा-हिंदूंचा परमद्वेष्टा जो औरंगजेच, तोही अनुक्रमें चितोडच्या राजीचे " राखीचंध माई " अशाच प्रकारचे नाते ठेवीत आले. अवरंगक्षेचानें आपलें स्वसप्रेम फारच उत्कृष्ट सेतीनें दाखविलें आहे. चितोडच्या राणीस त्यानें पाठ- विलेल्या पत्रांत प्रथमतः " प्रिय व सद्गुजवती भगिनी" असें लिहून शेवटीं " आपलें कुशल व कल्याण इच्छितों " अशा स्पष्ट सद्धांनी तिजवरील आपली भक्ति व प्रेम दाखवून तिचा गौरव केला आहे. - आणि त्याच्या ( अवरंगझेबाच्या ) स्वभाव. रीतीवरूत पाहिले असता अगदी चमत्कारिक भासण्यासारखें आहे. ४A