Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२) दिल्ली घेऊन आयाशहरही ताब्यांत घेतलें तरी सुद्धां संग ठिकाणचा हलला नाहीं. असाच प्रकार यावेळीही घडला. बाबर आपण होऊन पुढे येईल या आशेवर संग राणा स्वस्थ बसला. त्याचा फायदा बाबर यास पूर्णपणे मिळाला. रायसीनचा राजा सिलोदी यानें उभयतांचा स्नेह जुळावा ह्मणून केलेली मध्यस्थि व्यर्थ गेली, व उभयतांमधील रणसंग्रामाच्या पूर्व रंगास प्रारंभ झाला. युद्धास तोंड लागण्या पूर्वी राणा संग याच्या छावणीत राजस्थानमधील राजेरजवाडे, मांडलीक, सरदारमंडळी, व इतर रजपूतवीर मंडळी एकत्र जमली. त्यावेळी संग राण्यानें उमें राहून सर्वाना उद्देशून मोठें उत्साहजनक व वीरश्रीयुक्त भाषण केलें; क्षात्रधर्मास अनुसरून, व वाडवडिलांचे पराक्रम आठवून प्रत्येकानें या आणीबाणीच्या प्रसंगी वर्तन करावें, असा त्यानें सर्वात उपदेश केला, मुसलमानांचा पाडाव करण्याचा हाच योग्य प्रसंग आहे; आणि हा प्रसंग आपण साथिला ह्मणजे त्यांना पुन्हा आपले डोकें वर काढतां येणार नाही आणि सर्व देशभर हिंदू पद बादशाहीचा ध्वज फडकत राहील, अशी त्यांची खातरजमा केली. सर्वांनी उत्तरादाखल मोठा जयजयकार केला; संग राण्यानें युद्धाचा उपक्रम करून रजपूत सैन्य बियानानदी ओलांडून दिल्लीच्या रोखाने पुढे आलें, आणि ता० १६ मार्च १५२८ शनिवार रोजीं फत्तेपूर शिकी येथे घनघोर युद्ध होऊन बायर विजयी झाला; आणि हिंदूपदबादशाही स्थापन होण्याची चिन्हें व आशा पार नष्ट झाली. 2 राजा संग हा जरी बाचरचा शत्रू होता तरीही संगाबद्दल त्यास अतीशय आदर वाटत असे; त्याप्रमाणेच त्याचा प्रिय व पितृभक्त मुलगा हुमायून यास बाबरनें संग राण्याच्या गुणांचं जें वर्णन लिहून ठेविले होते ते माहीत असून संगाच्या वंशजाविषयीं त्याच्याही मनांत प्रेमभाव वसत होता; ह्मणून गुजराधकर बहादूरशहार्ने चितोडवर स्वारी केली त्यावेळीं संगाची राणी कर्णावती हिनें हुमायूनकडे राखी पाठविली व त्यास सा निरोप पाठविला कीं, तुझी माझे माऊ अहांत; तरी यावेळी आह्मास साह्य करून आमची अनू रक्षण करा. " ही राखी आल्याबद्दल हुमायुनास अतीशय आनंद झाला; आणि- जरी हुमायून येण्याच्या पूर्वीच राणी कर्णावती हिनें तेरा हजार रजपूत स्त्रियांसह अमीका भक्षण केली होती तरी त्यानें “ मी तुमचा राखीचंद भाई झीलों. तेव्हा आतां संकटा- , . टिप १ : - या बाबतीत लोकहितवादीकृत राजस्थानच्या इतिहासांत असे लिहिले आहे कीं, वरील रक्षाबंधनाचा असाच चमत्कार झाला की, ह्या राखीने केवळ हुमायूनच एकटा चितोडच्या राणीचा भाऊ झाला नाहीं तर त्याच्यापुढे त्यास