Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" ओोतविली त्याठिकाणों एक दगडी स्थान बांधवून त्या जवळ एक मिक्षागृह बांधण्याचा मी ठराव केला; व मी पुढे जेव्हां फसली सन ९३५ च्या मोहरम महिन्यांत धवलपुराहून शीकी येथें जातांना मार्गात ग्वाल्हेर येथे उतरलों त्यावेळीं वरील मद्यपरित्यागस्थान, आणि मिक्षागृह हीं बांधून तयार झालेलीं मी पाहिली. शिवाय मी असा नवस केला होता की, जर मला राणा संग याजवर जय मिळाला तर शिक्कयाचा जो कर मी वसूल करीत असे तो मुसलमानास माफ करीन..." नंतर बाबर यानें हा कर माफ केल्याबद्दल आपल्या ताब्यातील प्रदेशांत जाहीर केले; नंतर त्याने आपल्या सर्व लोकांस एकत्र बोलावून त्यांना उद्देशून मोठें जोरदार व उत्तेजनपर भाषण केलें; तो ह्मणाला:- “ भाई हो, आजपर्यंत तुली केवढा लौकिक मिळविला, व अनेक प्रसंगी कसे विजय संपादन केले ते लक्षांत आणा. काफर लोकांस भिऊन आपण पळालों तर ते लोक आपणांस काय ह्मणतील? आणि न पळालों तरी आपण शत्रूंच्या हांतून सुटूं असे थोडेंच आहे ? मनुष्यमात्रास जन्माप्रमाणेच मृत्यु हाही लागलेलाच आहे; आणि कधींतरी आपणासर्वास या दुःखमय जगांतून गेलेच पाहिजे. मग अकीर्तीने जिवंत राहण्यापेक्षां कीर्ति करून मृत्यु आलेला काय वाईट ? धर्माकरितां जीव देण्याचा प्रसंग आला तरी तेही सुद्धां पुण्यच आहे. ह्मणून आपल्या जिवांतजीव आहे तोपर्यंत आपण लहून प्रसंगी कटूनही मरूं, पण या युद्धांतून अपयश घेऊन केव्हांही परत फिरावयाचें नाहीं अशी आपण सर्व एक दिलानें शपथ घेऊंया. " असें ह्मणून त्यानें आपल्या लोकांकडून, मारूं किंवा मरूं, अशी कुराणावर हात ठेवून शपथ घेवविली, व नंतर आपला तळ उठवून संग राण्याशीं मुकाबला करण्याकरितां तो पुढे कूच करून निघाला. न राणा संग हा अतिशय शूर होता; त्याच्या शरीरावर मूर्तिमंत वीर्याच्या साक्षीच्या खुणा - तरवार माल्यांच्या जखमांच्या ऐशी खुणा दिसत होत्या भावाशीं युद्ध करितांना एक डोळा, व इब्राहीम लोदचिरोबरील युद्धांत एक हात नाहींसा झाला होता; अशाच दुसन्या एका युद्धांत गोळी लागून तो एका पायानें पंगू झाला होता. संग राणा हा असा अलौकिक योद्धा होता; अद्वितिय वीर पुरुष होता; बाबरच्या शब्द्धांत ह्मणावयाचें ह्मणजे " संगराणा जो इतक्या लौकिकास चढला तो केवळ स्वतःच्या शौर्यपराक्रमामुळेच होय, " ही त्याची योग्यता बाबर जाणून होता, तरी पण त्याच्या मध्ये असावी तितकी तरतरी व चपलता नव्हती; व हे वैगुण्य बाबर यास माहीत होतें. बाबर ह्मणतो:-" मी जेव्हा काबूल येथें होतों, त्यावेळी राजा संग यानें आपला वकील माझ्याकडे पाठविला होता; व मी दिल्लीवर चाल करून गेलों तर राणा संग यानें आयो शहरावर चाल करून यावें, असा त्या वकिलामार्फत आमचा परस्पर ठराव झाला होता परंतु मी पुढे