Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)


हे हिंदुस्थानांत परस्परांविरुद्ध वर्चस्व प्राप्तिकरितां काही काळ मोठ्या चिकाटीनें सारखे झगडत राहिले; पण स्वकीयांविरुद्ध ते लढले नाहींत. वारनहेस्टिंगस् याचें हिंदुस्थानांतील आयुष्य आपल्या कौन्सिलांतील लोकांशी भांडण्यांत खर्च झालें, आणि डुप्ले, लाली व बुशी यांचीही आपआपसांत मोठ्या जोराची अनेक भांडणे झाली; पण त्यांनी आपल्या प्रतिस्प यांचा नाश करण्याकरितां एतद्देशियांची मदत घेतली नाही, किंवा युरोपियन कंपनीविरुद्ध फुटून, फितूरी होऊन, अथवा थंड करून कोणीच युरोपियन निराळा निघाला नाहीं, इतकेच नव्हे तर हिंदी राजेरजवाड्याच्या पदरीं जे युरोपियन लोक नौकरींत राहिले, त्यांनीही नौकरीस राहतांना प्राय:असाच करार केला होता की, स्वकीयांविरुद्ध युद्ध सुरू झालें असतां त्यांत आह्मी भाग घेणार नाहीं; ह्मणजे स्वदेश, व स्वकीय ही भावना ते हिंदी राजेरजवाड्यांच्या नौकरींत राहिले तरी विसरले नाहीत, ही गोष्ट आपण ध्यानांत ठेविली पाहिजे. स्वदेश व स्वकीय भक्तिनिष्टेचा हा धडा आपण सदैव आपल्या डोळ्यापुढे ठेवून त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे, इंग्रजांच्या देवाइतकेंच, स्वदेशप्रीति, स्वकीयांचा अभिमान, राष्ट्रकार्याची तत्परता, स्वार्थत्याग, चिकाटी, दीर्घोद्योग, मेहनती व काटक स्वभाव, कर्तव्यनिष्ठा, वगैरे त्यांच्या अंगी वसत असलेले अलौकिक व अमोल्य सद्गुणही त्यांच्या उत्कर्षात व साम्राज्य संस्थापनेस कारणीभूत झाले आहेत हें कबूल करणें भाग आहे. इंग्रजांच्या संबंधानें लिहितांना ज्याप्रमाणें ऐतिहासिक दृष्टी कायम ठेवून त्यांच्यावर प्रसंगाप्रमाणे टिका करावयाची त्याप्रमाणेच त्यांनी केलेली सत्कृत्यें, व त्यांच्या अंगी वसत असलेलेसद्गुण याबद्दल त्यांची तारीफही केली पाहिजे, इंग्रजलोकांत जाज्वल्य देशाभिमान " आहे, आणि हा सद्गुण आपण त्यांच्या पासून शिकलों तर आपलें व हिंदुस्थानचे कल्याण होईल, अशी खात्री आहे.
 हिंदुस्थानांतील मुसलमानी इतिहासाचे तीन काळ पाडितां येतात; त्यांपैकी, हिंदुस्थानावर मुसलमान लोकांनी स्वाऱ्या केल्या, परंतु इकडे स्थाईक न होता इकडून लूट मिळवून ते परत स्वदेशी गेले, तो पहिला काळ, मुसलमान लोक इकडे स्थाईक होऊन त्यांनी अनेक राज्य स्थापन केली आणि दिल्ली येथें मोंगल बादशाही स्थापन होईपर्यंत तेथील बादशाहतीचा उपभोग घेतला तो दुसराकाळ; आणि बाचर यानें दिल्ली येथें जें भावी एक अत्यंत वैभवसंपन्न मोगल साम्राज्य स्थापन केलें; त्या साम्राज्याचा अवरंग- षापर्यंतचा काळ हा तिसरा होय. या तीन्हींही काळासंबंधी पाहतां असें स्पष्ट दिसून येतें कीं, मुसलमान लोकांनी हिंदुस्थानावर स्वाऱ्या केल्या, त्या पहिल्या काळापासूनच हिंदू राज्यकर्ते, व विशेषतः रजपूत नौद्रमंडळी मुसलमानी सत्तेस नेहमीं सारखा मोठ्या जोरानें प्रतिरोध करीत आले आहेत आणि त्यांच्या स्वान्यांचे सर्व आधातही पहिल्यानें