Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६)


उत्तर हिंदुस्थानांतील हिंदू व रजपूत राज्ये यांनांच सारखे सहन करून त्यांचा प्रतिकार करीत रहावें लागलें आहे.
 हिंदुस्थानांतील हिंदू राज्यें, आणि मुसलमान लोक यांच्या मधील वर्चस्व प्राप्तीकरितां झालेल्या युद्धकलहांची, पहिल्या भागांत व या भागांतील पुढील पानांत आवश्यक ती माहिती दिली आहे; खलीफा उमर याच्या कारकीर्दीत तैग्रीस नदीवर बसरा है प्रसिद्ध शहर त्यानें बसविल्यानंतर, त्या बंदरावरूनच हिंदुस्थानांतील सिंध व गुजराध या प्रांतांशी तुर्कस्थान देशाचें व्यापारी दळणवळण चालू असे, याच काळांत तुर्कसरदार अबुलभास यानें गुजराथेवर स्वारी केली होती; परंतु आरोर येथील युद्धांत त्याच्या सैन्याचा सर्वस्वी नाश झाल्यामुळे ती स्वारी पूर्णपणें निष्फळ झाली. पुढे खलीफ। उस्मान यानें या युद्धाची संपूर्ण हकीकत आपणास कळावी ह्मणून हिंदुस्थानांत आपले कांहीं लोक तपासाकरितां पाठविले, व तो स्वतःही हिंदुस्थानावर चाल करून येण्याच्या विचारांत होता पण तो त्याचा बेत सिद्धीस गेला नाहीं. पुढे खलीफा अल्ली याने हिंदुस्थानांवर सैन्य पाठवून सिंध प्रांत आपल्या हस्तगत करून घेतला; परंतु अल्लीच्या मृत्यूनंतर त्या प्रदेशावरील त्याचा अंमल नाहींसा झाला. पुढे खलीफा अब्दुल मलिक याच्या कारकीर्दीत खोरासान येथील यजीदाच्या सैन्यानें हिंदुस्थानांवर कित्येक वेळां स्वान्या केल्या पण प्रतावर त्याचा अंमल न बसतां तिकडून लूटी मिळवूनच त्यांना परत जावें लागलें; त्यानंतर वलीद व नंतर महंमद कासम यांनी सिंधप्रांतावर स्वान्या केल्या; त्यानंतर महंमद या नांवाच्या एका मनुष्यानें कनोजवर व अल्मनसूर यानें सिंधमांनावर स्वारी केली; याचवेळी खोरासान येथील राज्यकर्ता यज्द याचा मुलगा तिकडून पळून सिंध प्रांतांत येऊन राहिला होता; अलूमनसूर याने खलीफा अभ्यास याच्या नांवानें सिंध प्रांतावर बरीच वर्षे अंमल चालविला, मनसोरा ऊर्फ मीननगर हैं यावेळी त्याच्या राजधानीचे शहर होतें, पुढे खलीफा हारून- अल्- रशीद यानें आपल्या राज्याची वांटगी केली त्यांत सिंवर्मात अलूमामून यांस मिळाला; व पुढे इ० सन ८१३ मध्ये तो खलीफा झाल्यावर त्याने चितोडवर सैन्य पाठविलें; पण अंतस्थ मानगडीमुळे त्यानंतर हिंदुस्थान देशाकडे लक्ष देण्यास त्यास अवसर मिळाला नाहीं. पुढे इ० सन ९७५ मध्ये समक्तगीन हिंदुस्थानांवर स्वारी केली; व त्यानंतर या देशावर अनेक वेळां स्वाऱ्या करून अनेकत्याचा मुलगा महंमूद यानें तर देवालयांचा व शहरांचा नाश करून - अगणित संपति स्वदेशीं नेली, व या काळापासून मुसलमानांचे हिंदुस्थान देशाबरोबरील राजकीय दळणवळण भव्य प्रमाणात सुरु झाले.