Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३ )


विरुद्ध बादशहाकडे पुष्कळ गाहाणे केलें; यावेळी फर्रुतसेयर यास काळपुळी होऊन तो अतिशय आजारी होता; अशावेळीं-ह्मणजे सर्व वैद्यांचे उपाय थकल्यामुळे प्रत्यक्ष बादशहाच या आजारीपणांतून आपण कसें जगूं, या विवंचनेत असतां इंग्रजांची तेथें दाद लागणें जवळजवळ अशक्यच होते; पण इंग्रजांच्या सुदैवाने त्यांच्या उपरीनिर्दिष्ट दोन वकिलांबरोबर हॅमिल्टन या नांवाचा एक शखवैद्य होता; त्यास बादशहास औषधोपचार करण्याबद्दल विनंती करण्यांत आली; व ती त्याने तात्काळ मान्य करून, व बादशहावर शस्त्र प्रयोग करून त्यास अल्यकाळांतच पूर्णपणे बरें केलें; नंतर बादशहाच्या या दुखण्यामुळेच त्याचें अजीतसिंहाच्या मुलीशी ठरलेले लय लांबणीवर पडलें होतें तें निविघ्न- पर्णे तडीस गेलें; हॅमिल्टन यार्ने आपणांस जीवदान दिले, हे त्याचे आपणावर फार मोठे उपकार झाले, अ बादशहास वाटत असे, त्यामुळे हॅमिल्टन यास त्यानें तो मागता तितकें द्रव्य दिले असतें; पण त्याने बादशहाजवळ स्वतः करितां कांहींही मागितले नाहीं, त्यानें बादशहास अर्ज केला कीं, “ बंगालच्या सुभेदारा विरुद्ध कंपनीने ज्या तक्रारी केल्या आहेत, त्या बादशहानें कचूल करून त्याप्रमाणे फर्मान मिळावें;" उपकारानें बद्ध झालेल्या बादशहानें आपल्या फर्मानाचा काय परिणाम होईल, याचा विचार न करता, हॅमिल्टनच्या ह्मणण्याप्रमाणें फर्मान काढिलें, आणि मोंगली राज्यांत इंग्रजांना कांहीं ठरीव अटींवर बादशहानें जकातीची माफी कायमची करून दिली. ( ता० ६ जानेवारी, ३० सन १७१७ )
 हॅमिल्टन याच्या या उदात्त वर्तनावरून काय बोध घ्यावयाचा ? इंग्रज लोकांत जे कित्येक अलौकिक सद्गुग आहेत, त्यांतीलच त्यांचा " देशाभिमान " हाही एक सद्गुण आहे. हिंदुस्थानांत याची फारच अल्पप्रमाणांत पैदास आहे; ह्मणून आपण हिंदवासीयांनी सर या सद्गुणाचें अवश्य अवलंचन केले पाहिजे. उलटपक्षी इंग्रजलोकांत हा सद्गुण नसलेल्या लोकांची फारच अल संख्या आणि तीही कचितूच आढळेल. स्वतःच्या फायद्यापेक्षां राष्ट्रीय फायद्याचें महत्व नेहमी डोळ्यापुढे ठेवून त्या प्रमाणे आचरण करण्याचा गूण इंभज लोकांच्या अंगी पूर्णपणे बागला असल्यामुळेच त्यांचा अतीशय उत्कर्ष झाला आहे, व आज सर्व जगभर त्यांचे साम्राज्य पसरले आहे. स्वतःचा फायदा एका बाजूस सारून राष्ट्राचा फायदा करण्याचा देशाभिमान जिवंत, जाग्रत व प्रखर असेल तरच राष्ट्रास सुखाचे दिवस येतात, व नंतर राष्ट्रीय सुखाच्या सावलीत व्यक्तीचे हित सहजच साधलें जातें. क्लाईव्हची काहीं कृत्यें दूषणास्पद असली तरी मिरजाफरच्या मृत्युपत्रामुळे त्याला जी संपत्ति मिळाली तिचा विनियोग त्याने आपल्या देशाच्या लष्करी अंमलदारांच्या उपयोगार्थं केला. उलटपक्षी सडी येथील युद्धानंतर, पेशव्यांशी निजामअलीचा तह झाला