Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )


पासून झालेली असल्यामुळे आणि बाटलेल्या हिंदूलोकांनी आपले आचार-विचार व चाली- रीति कांहींशा कायम ठेविल्यामुळे हिंदूलोकांच्या संस्काराचा थोड्याफार प्रमाणांत मुसल- मानांवर पगडा बसला; आणि हिंदूधर्म, हिंदूसंस्कृति, व भाषा, ह्रीं कायम राहून व कांहीं काळ त्यांची वाढ होऊन-हिंदूंच्या व मराठ्यांच्या उत्कर्षास जी अनेक प्रमुख कारणे झाली, त्यांतीलच हैही एक झालें.
 मुसलमान राज्यकर्त्यांशी लग्न - संबंध करण्याचा प्रघात, मोंगल बादशाहीच्या काळांत प्रथमतःजयपूरकर राजा भगवानदास यानें पाडिला; व आपली मुलगी हुमायून बादास दिला; व पुढे तो वाढत गेला; जहांगीर, खुश्रू, शहाजहान वगैरे मंडळी हिंदूं आईपासून रजपूत स्त्रियांपासून झालेली असून हाच प्रघात मोंगल बादशाही मरणोन्मुख झाली तरी कायम होता व त्या वेळीही फरुख सेयर ( कारकीर्द इ. सन १७१३-१९ ) यानें मारवाडचा राजा अजीतसिंह याच्या मुलीशी लग्न केलें होतें. तथापि हा ल संबंध ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे, व त्यामुळेच इंग्रजांचें बंगाल प्रांतामध्यें महत्व स्थापन झालें आहे; आणि योगायोग असा की या लग्नामुळे फर्रुखसेयर व अजित सिंह या दोघांपेक्षा इंग्रजांचाच अधीक फायदा झाला; तो प्रकार थोडक्यांत पुढे लिहिल्याप्रमाणें आहे; इ० स १६९६ मध्यें बादशहा अमलगीर ऊर्फ अवरंगझेच यानें आपला नातू शहाजादा अजीमुश्शाम यास बंगालच्या सुभेदारीवर नेमिलें; त्यानंतर दोनच वर्षांनी, इ० सन १६९८ मध्यें, इंग्रजांनी त्यास नजराणें देऊन सुतनही, काली- कोट आणि गोविंदपूर ही तीन गांव दरसाल ११९५ रुपये सारा भरण्याच्या अटीवर खरेदी केलों; पुढें इ० सन १७०१ मध्यें मूर्शिदकुलखिान याची अजीमुश्शामच्या हाता- खाली बंगालच्या दिवाणीवर नेमणूक झाली व पुढें इ० सन १७१३ मध्यें तोच बंगालचा सुभेदार झाला; मूर्तीदकुलीखान हा मोठा करडा अधिकारी असून तो मूळचा ब्राह्मण असून पुर्दे बाटून मुसलमान झालेला होता; इंग्रजांनी उपरीनिर्दिष्ट तीन गावें खरेदी केल्यानंतर त्यांस जमीनदारांची पदवी प्राप्त झाली. व इतर जमीनदारांप्रमाणेच लोकांना दंड अथवा शिक्षा करणें, फटके मारणे वगैरे प्रकारांनी तेही या तीन गांवांवर आपला अंमल चालवूं लागले; तथापि ही गोष्ट हुगळी येथील मोंगल अधिकान्यास पसंत पडली नाहीं, व त्यानें त्याबद्दल अजी मुश्शामकडे कागाळी केली; पण इंग्रजांनी त्याची तोंडदाची केल्यामुळे त्या कागाळीचा काहीही उपयोग झाला नाहीं. तथापि पुढे मूर्शिदकुलीखान कडून इंग्रजांना त्रास होऊं लागला; तेव्हां आपल्या व्यापाराची कायमची फायदेशीर व योग्य व्यवस्था लावून घेण्याकरितां इ० सन १७१५ मध्यें कलकत्तेकर इंग्रजांनी दिल्लीस फर्रुखूसेयर बादशहाकडे जॉन सर्मन, ष कोगीसर होद हे दोन वकील पाठविले; त्यांनी बंगालचा सुभेदार मूर्शिदकुलखिान याच्या