Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. eso , " मागील भागांत हिंदुस्थानांतील विजयानगरच्या राज्यापर्यंतचीं हिंदू राज्यें, हिंदू संस्कृति, हिंदू धर्मातील उदात्त तलें, वगैरे बायतींचें विवेचन केले आहे. तथापि विजया- नगरच्या राज्याचा नाश होण्याच्या अगोदरपासूनच हिंदुस्थानांवर मुसलमान लोकांच्या छअनेक स्वान्या होऊन, त्यांनी अनेक प्रसिद्ध हिंदू राज्यांप्रमागेंच, याही वैभव-संपन्न राज्याचा नाश केला आहे; आणि इकडेसच स्थाईक होऊन त्यांनी हिंदुस्थानांत राज्ये संपादन केलीं आहेत. हिंदुस्थानांत मोंगली साम्राज्य स्थापन होईपर्यंतच्या काळांत, दिल्लीच्या तख्तावरील अनेक राजघराण्यांची उलटापालट झाली; पण बादशहा बाबरपासून हिंदुस्थानांत नवे मन्वंतर सुरूं झालें, व हेंच घराणे " हिंदुस्थानचे बादशहा " ह्मणून कायम राहून, मोंगल राष्ट्र है जगांतील अत्यंत वैभव-संपन्न राष्ट्र ह्मणून नांवाजलें गेलें तथापि याच बलिट मोंगल सत्तेशी अवरंगशेचाच्या काळांत सारखें झगडत राहून, मराठ्यांनी आपले अस्तित्व कायम ठेविलें आहे; व आपल्या सत्तेचा विस्तार करीत करीत एकेकाळी तर खुद्द मोंगल बादशहा शहाअलम यासच त्यांनी आपल्या तरवारीस तोफांचें पाठबळ देऊन, दिल्लीच्या तख्तावर आणून बसविलें आहे; ह्मणजे मराठ्यांचा इतिहास मोंगल बादशाहीपासून बनलेला आहे; मराठ्यांचें साम्राज्य भोंगली साम्राज्यांतून निर्माण झालेले आहे, वाढीस लागलेलें आहे; आणि पुढे औपचारीकरीत्या मोंगल बादशाहीचा सांभाळ करून हिंदुपदबादशाही स्थापन करण्याचे मराठ्यांचे धोरण बळावत गेलेले आहे. झणून हिंदुस्थानांतील मुसलमानी राज्यें, मोंगल बादशाही व त्या काळांतील युरो- पांतील राज्ये यांचें तुलनात्मक विवेचन, मुसलमानी धर्म, व त्याचें रहश्य, त्या काळांत हिंदू लोकांना प्राप्त झालेले राजकीय वर्चस्व, वगैरे बाबतीत प्रास्तावीक माहिती ह्मणून या दुसऱ्या मार्गात ग्रथित केली आहे व पुढील इतिहास वांचतांना ती लक्षांत घेणें आवश्यक आहे. . हिंदुस्थानांत मराठ्यांचा राजकीय संबंध मोगल साम्राज्याशी आलेला असल्या- मुळे त्या काळापासूनच्या राजकीय स्थितीचें या ठिकाणी थोडक्यांत विवेचन करणे आवश्यक आहे. हिंदुस्थानात मोंगली सामान्य स्थापन होण्याच्या पूर्वीच कित्येक मुसलमान राज्यकर्त्यांनी हिंदूमुलींशीं लम-संबंध केले होते आणि पुढे मोंगल-बाद- शाहतींत तर असे लम-संबंध पुष्कळच अधीक प्रमाणांत घडून आले. शिवाय मुसलमानी धर्म स्वीकारणाऱ्या हिंदूंची संख्याही अधीक वाढत गेली; तथापि पुढील काळांतील मोंगल बादशहा, राजपुत्र-मंडळ, व अनेक सरदार व दरबारी मंडळी, ही हिंदू भाई-