Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १० ) आरटे; किंकेड व इतिहाससंशोधक मंडळ ( पुणे ) वगैरे अनेक संशोधकांनी, लेखकानीं, व संस्थांनी मराठी इतिहासाचें पुष्कळ नवीन साहित्य प्रसिद्ध केले आहे. त्याची जुळवाजुळव व चिकित्सा करून त्यांतून मराठ्यांच्या इतिहासाचें मंदिर उभारण्याचे काम कल्पक व चतुर इतिहासकाराचे आहे. रा. सरदेसाई यांनी तें काम उत्तम तन्ऱ्हेनें चालविलें आहेच परंतु श्री. करकरे यांचा हा प्रयत्न त्याहूनही विस्तृत आहे. त्यांच्या इतिहासाचीं ४ ते ५ हजार पूछें होतील, असा अंदाज आहे; व या ग्रंथीत मराठ्यांच्या इतिहासा में गथातथ्य प्रतिचिंच उमटेल, असा भामचा अंदाज आहे. , ( यासाठी पंथकर्त्यांस कांही स्नेहमावाच्या सूचना करून ' मराठ्यांच्या इतिहास काराची आह्मी रजा घेतों. ( १ ) मराठ्यांच्या कारकीर्दीत स्वराज्यविघातक अशा ज्या ज्या चुका मराठ्यांच्या अथवा पेशव्यांच्या हातून घडल्या असतील, त्याचं त्यांचे आदि- ष्करण करून पुढे त्याच चुका लोकांच्या हातून न घडाव्यात ह्मणून त्यांस ठिकठिकाण इशारा देण्यांत यावा. इतिहासकारानें जशी सद्गुगांची पाठ थोपटली पाहिजे; तशीच राष्ट्रीय दुर्गुगांचे कगळावर काठी मारण्यासही चुकलां कामा नये. ( २) इतिहासकारानें ऐतिहासिक सत्याची छवाछव करूं नये, हे खरे. परंतु, ते सत्य पुढे मांडतांना हल्लींच्या समाजांत कलहाग्नि न भडकेल, अशी खबरदारी घेतली पाहिजे. कित्येक सत्ये कडू औष धाच्या गोळीप्रमाणे शर्करावगुंठित केल्यास ती वाचकांस पचूं शकतात | इतिहास है अनेक बन्यावाईट सत्य गोष्टींचे भांडार आहे. त्यांत टाकाऊ व निरुपयोगी अशाही सत्य गोष्टींची पुष्कळ अडगळ पडली आहे. त्या अडगळींतून भावी राष्ट्राला उपयुक्त व मार्गदर्शक अशी सामुग्रीच निवडून देऊन व ती नीट जुळवून लोकांच्या हातात देणें, यांतच इतिहासकाराचें कौशल्य आहे. ( 3 ) ऐतिहासिक सिद्धांत व अनुमानें स्वतःच्या शब्दांनीं सांगण्यापेक्षां आपल्या विषयाची मांडणीच अशी करावी कीं, त्या मांडणीवरून वाचकांनी स्वतःच ते सिद्धांत किंवा ती अनुमान सहज काढावीत | ( ४ ) पहिल्या भागांत हस्व दीर्घादि- कांचे मुद्रगमनाद ठिकठिकाणी झाले आहेत. अशा महत्वाच्या ग्रंथास ते शोभत नाहीत- ह्मणून पुढील भागांत तिकडे विशेष लक्ष पुरवावें. श्री० करकरे यांचा ' मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्रांत लोकप्रिय होऊन त्यास सर्व सार्वजनिक व खासगी वाचनलायांत जागा मिळेल, अशी आह्मांस खात्री वाटते. ( पहिल्या भागाची किंमत २॥ रु० ) "