Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मध्यप्रांतांतील प्रमुख वर्तमानपत्र 'महाराष्ट्र' ता. १-११-२२ मधील अभिप्रायाचा उतारा. मराठ्यांचा इतिहास. (ले० श्री दत्तात्रय बाळकृष्ण करकरे, जळगांव ) भाग १ ला. हा आमचेकडे अभिप्रायार्थ आल्यास बरेच महिने झाले. या भागांत प्रत्यक्ष महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास बिलकूल आलेला नाहीं; परंतु, सुमारे १ हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत मराठा राष्ट्र निर्माण होण्याची चिन्हें दिसूं लागेपर्यंत पूर्वीच्या २१३ हजार किंवा त्याहून जास्त वर्षांचा हिंदुस्थानचा पूर्वेतिहास या प्रास्ताविक भागांत संक्षेपतःच परंतु व्यापक व मनोरंजक रीतीने संकलित केला आहे. वेदकालापासून-आर्य लोक मध्यएशियांत हिंदुस्थानांत आले असें ह्मणतात, तेव्हांपासूनच-हिंदू समाजाचा व हिंदू संस्कृतींचा इतिहास थेट इ. स. १५६२ सालीं तालीकोटच्या लढाईनें विजयानगरच्या राज्याचा नाश होईपर्यंत विहंगम दृष्टीने पाहून यांत प्रथित केला आहे. इंग्रजीत प्राचीन हिंदुस्थानच्या इतिहासाची काही पुस्तकें गेल्या ४०/५० वर्षात पैदा झाली आहेत. परंतु, त्यांतील माहिती विवेचक दृष्टीनें व काळजीपूर्वक एकत्र करून ती मराठी वाचकांस सादर करण्याचे काम अद्यापि कोणी केलें नाहीं. तो प्रयत्न श्री० करकरे यांनी या पहिल्या भागांत केला आहे. तेणेंकरून माहितीच्या दृष्टीनें है पुस्तक अमूल्य व वाचनीय झाले आहे. प्रथम वैदिक व पौराणिक कालाचा वृत्तांत व दंतकथा वर्णन करून नंतर इतिहासाच्या अंधुक प्रकाशांतून मुसल मानी वर्चस्त्रापर्यंत ग्रंथकारानें आपला मार्ग काढिला आहे; अनेक शतकांतील राजकीय इतिहासाचा परामर्ष घेतल्यावर शेवटची शंभर पाने हिंदुस्थानचें प्राचीन वाङ्मय, तत्वज्ञान, राज्यव्यवस्था, गणित, ज्योतिष, युद्धशास्त्र, राजनीतिशास्त्र, शिल्प, गायन, वैद्यक, समुद्रयान, हिंदूंच्या परद्वीपांतील वसाहती, व्यापार इ. गोष्ठींचे अत्यंत मनोवेधक वर्णन वाचल्यावर प्राचीन हिंदू संस्कृतीचें महत्व व वर्चस्व वाचकांच्या मनावर ठसल्याशिवाय राहणार नाहीं. अर्थात ही पूर्वेतिहासाची भूमिका रंगविल्यामुळे त्यावर मराठ्यांच्या इतिहासाचें चित्र उठावदार दिसणार आहे. पुढे होणारे ' मराठ्यांच्या इतिहासा' चे १४|१५ भाग विचारांत न घेतले, व हा भाग स्वतंत्र घेतला, तरी तो अत्यंत वाचनीय व संग्रहणीय झाला आहे. यांत तिळमात्र शंका नाही. यापुढील भागही असेच मनोरंजक व माहितीपूर्ण निपजतील अशी आह्मास खात्री वाटते, हल्लीं साने, राजवाडे, खरे, पारसनीस, भावे, देव, चांदोरकर २