Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११ ) " वहाडांतील प्रसिद्ध वर्तमान पत्र " उदय - अमरावती. मंगळवार ता० ११ जुलै सन १९२२ इ. - - " मराठ्यांचा इतिहास - श्री. दत्तात्रेय बाळकृष्ण करकरे हे हल्ली येथें माले असून येथें इतिहासप्रिय लोकांस त्यांनी गेल्या बुधवारी सुमारे दोन अडीच फारच श्रमपूर्वक मिळविलेली अशी उत्कृष्ट ऐतिहासिक माहिती सांगितली, ही माहिती ज्यानें ऐकली असेल त्यास श्री. करकरे यांनी इतिहासाचा किती श्रमपूर्वक अभ्यास केलेला आहे. याविषयों शंका राहणार नाही. या माहितीवरून हिंदुस्थानच्या इतिहासाच्या घडामोडींच्या कारणांविषयींहि त्यांनी आपले काहीं सिद्धांत बसावले आहेत व ही माहिती व हे सिद्धान्त एकत्र यथित करून ते " मराठ्यांचा इतिहास " ह्मणून तीन तीनशे पानांच्या चवदा, पंदरा, भागांच्या ग्रंथांत सुसंगतपणे मराठ्यांचा प्राचीन काळापासून अगदी अर्वाचीन काळापर्यंत साम इतिहास लिहून काढणार आहेत. श्री. सरदेसाई यांच्याशिवाय, सर्व उपलब्ध तुटक तुटक नवी माहिती श्रमपूर्वक संकलित करून सरळ इतिहास लिहून काढण्याचा प्रयत्न मराठींत दुसन्या कोणीहि आजवर केला नव्हता, पण या कामाची गरज अत्यंत आहे. आणि है संकलित इतिहास लेखनाचें काम इतिहासाची साधनें उपलब्ध करून घेण्याइतकेंच किंबहुना असल्यास त्याहून थोड़ें अधिकच कठिण आहे; व हॅ काम एकानेंच नव्हे, तर अनेकांनी आपआपल्या दृष्टीनें, व वेळोवेळी अधिकाधिक साधनें उपलब्ध होतील तसतसें करीत गेलें तरच महाराष्ट्रासारख्या प्रदेशाचा खरा उत्कृष्ट इतिहास काही दिवसांनी तयार होण्याची आशा आहे. या दृष्टीनें श्री० करकरे यांचें काम अत्यंत स्तुत्य आहे यांत शंका नाहीं व इतकें कष्टाचें काम हाती घेतल्याबद्दल आह्मी श्री. करकरे यचं अभिनंदन करितों व सुंदर माहितीनें भरलेल्या श्री. करकरे यांच्या ग्रंथास महाराष्ट्र आश्रय देऊन श्री. करकरे यांस आपलें अंगिरुत दुर्घट कार्य पार पाडण्यास समर्थ करील अशी आशा बाळगतों. श्री. करकरे यांच्या ग्रंथाचा पहिला भाग प्रसिद्ध झाला असून दुसरा भाग छापत आहे. व त्यास आणखी आश्रयदात्यांची गरज आहे.