पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुन्हां मोठ्या जोरानें व ईर्षेनें निजामशाहीचा उद्धार करण्याच्या खटपटी स लागला.

 या काळांत, म्हणजे इ. सन १६३० ते इ. सन १६३३ पर्यंतच्या तीन वर्षांच्या काळांत, शहाजीच्या संसारिक आयुष्यक्रमांत दोन महत्वाच्या गोष्टी


बागलाण व मालेगांव तालुक्यांतून पूर्वेकडे गेली आहे; या ओळींत साल्हेर ( ५२५३ फूट ), मुल्हेर ( ४३२० फूट ), गाळणे ( २३१६ फूट ), ह्रीं शिखरें असून त्यांवर डोंगरी किल्ले आहेत.

 चांदवडच्या डोंगराची ओळ ही चांदवड व डिंडोरी या तालुक्यांच्या उत्तर सरहद्दीवरून सरळ पुढे जाऊन नंतर मनमाडजवळ दक्षिणेस वळली आहे; व पुन्हां पूर्वेस वळून नांदगांव व येवलें या तालुक्यांच्या मधून ती पूर्वखानदेशांत गेली असून त्यास " अजिंठ्याचे डोंगर " असें म्हणतात; यांतच प्रसिद्ध " अजिंठ्याची लेणीं" आहेत. या चांदवडच्या डोंगराच्या ओळींतच सप्तशृंगचा डोंगर (४६५९ फूट), धोडपचा किल्ला (४७६१फूट), इंद्राईचा किल्ला (४५२६ फूट ), चांदवडचा किल्ला ( ३९९४ फूट ) व अणकाईचा किल्ला ( ३१८२ फूट ) ह्रीं ठिकाण आहेत. औंढया पट्ट्याच्या डोंगराची ओळ इगतपुरी व सिन्नर तालुक्याचे दक्षिण हद्दीवरून पुढे गेलेली आहे; व त्याच्या तीन ओळी असून पहिलींत कळसूबाई, वितनगड, अवंढा प्रतापगड, सोनगड व महाकाळी ही शिखरें व किल्ले आहेत; त्यांत कळसूबाई हे सर्वात उंच शिखर असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून ५४५० फूट आहे. दुसरी ओळ म्हणजे रतनगडापासून निघालेली " बालेश्वरी " डोंगराची ओळ हाँ होय; प्रसिद्ध प्रवरा नदी ही रतनगडाजवळच उगम पावत असून या ओळींत कात्राबाई, सुरा, बालेश्वर, व धुम्या हे डोंगर व उंच शिखरें आहेत; व तिसरी ओळ म्हणजे " ब्राह्मण वाड्याचें डोंगर " ही असून ती हरीश्चंद्रगडापासून पूर्वेकडे व अग्नेयीकडे गेलेली आहे; व ब्राह्मण वाड्याचा घाट " पुणे - नःशौक मार्गावर आहे. हरीश्चंद्रगडापासून निघालेला सह्याद्रीचा फाटा हा महत्वाचा पाणलोट असून याचे दक्षिणेकडील पाणी भिमा नदीकडे व उत्तरेकडील गोदावरी नदीकडे वहात जातें. चांदवडचे डोंगर व औंढया