पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८७)

लागोपाठ घडून आल्या; त्यांपैकी पहिली म्हणजे इ. सन १६३० मध्ये शहाजीनें विजापूरकरांचा प्रसिद्ध व एकनिष्ठ सरदार, सुपें येथील बाजी मोहिते “ अमीरराव " पोगरवाडीकर याची बहीण नामें तुकाबाई हिच्याशीं दुसरा विवाह केला, ही होय; या वेळेपासून ती व राजे संभाजी हीं उभयतां शहाजीबरोबर असत. या बाईचे पोटी शहाजीस इ. सन १६३१ मध्ये


पट्टयाचे डोंगर यांच्यामधील प्रदेशास " गोदावरी नदीचे खोरें" अर्से म्हणतात; व भिमा नदीच्या कांठच्या प्रदेशास " भिमथडी " म्हणतात. विशेष माहिती: -

 ( १ ) घोडप येथें पहिल्या माधवराव पेशव्यानें त्याचा काका राघोबा दादा याचा पराभव करून ( इ. सन १७६८ ) त्यांस पकडलें.
 ( २ ) गाळणे हा किल्ला पूर्वी होळकराचे ताब्यांत असून त्यांत इ. सन १८३४ पर्यंत होळकराची टांकसाळ होती.
 (३) साल्हेर हा किल्ला हल्ली गायकवाडाच्या ताब्यांत आहे; ह्या किल्ल्या- वर मोंगल व मराठे यांच्यामध्ये इ. सन १६७२ मध्ये एक मोठी लढाई झाली.
 ( ४ ) मुल्हेर, मोसम नदीच्या काठीं; या ठिकाणी उद्धवस्वामीची समाधो आहे; आश्विन शुद्ध १५ स रास होतो, त्यावेळी यात्रा भरते.
 ( ५ ) दिंडोरी, धामण नदीच्या कांठीं; तालुक्याचे ठाणें; पहिल्या माध- बराव पेशव्याची आई गोपिकाबाई ही नाशीकजवळील गंगापूर या गांवों राहण्यास आल्यानंतर दिंडोरी तालुका पेशव्यांनी तिच्या खासगी खर्चास तोडून दिला होता.
 ( ६ ) गंगापूर, नाशीकपासून अजमार्से सहा मैलांवर, गोदावरी नदीच्या तीरी आहे. येथील वनश्री आनंददायक असून या गांव गोदावरी नदीचा धबधबा आहे; त्याची उंची सरासरी ३२ फूट असून त्यास दुधस्थळी व गंगापुरास " गोवर्धन -गंगापूर " असे म्हणतात. येथे गोपिकाबाई इ. सन १७६४ मध्ये राहण्यास आली; व ती तिचा काल होईपर्यंत तेथेंच राहिली. गंगापूर येथे नदीच्या कांठी गोपिकाबाईस राहण्याकरितां एक सुंदर वाड़ा बांधण्यांत आला होता; शिवाय नदीस घाट बांधून लहान लहान आराम-