पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८५)

च्या दिजंबर महिन्यापर्यंत तर ते या धंद्यांत इतके पटाईत, इतके तयार, इतके तरबेज बनले की, त्यांनी आपल्या सैन्यानें व शस्त्रानें, तरवारीस तोफ खान्याचें जंगी पाठबळ देऊन बादशहा शहाभलम यास, तो अलाहाबादे- हून दिल्ली येथे येण्यास निघाल्यावर कुरा प्रांताच्या सरहद्दीपर्यंत त्याला पोहोंच- विण्यास आलेला इंग्रजतुकडीवरील अधिकारी " मराठ्यांची संगत धरूं नका " असे बजावीत असतांही, जो " डोळे मिटून " पण वास्तवीक उघडे डोळे ठेवून, मराठ्यांना येऊन मिळाला, त्या बादशहा शहाअलम यास, दिल्ली येथील बादशाही तख्तावर सहज स्थानापन्न करून टाकिले, म्हणून, आणि या दृष्टीने विचार केला म्हणजे " निजामशाही राज्य एका मराठा सरदारानें पुन्हां जिवंत करणें" ही गोष्ट, जरी त्यांत अखेरीस अपयश आलें, तरीसुद्धां अत्यंत महत्वाचीच आहे, असे म्हणण्यास हरकत नाहीं.

 हा मराठा वीरपुरूष म्हणजे छत्रपति शिवाजीचा पिता शहाजीराजे हा होय; मोंगली सैन्य निजामशाही राज्याचा निकाल उडवून परत फिरतें न फिरतें तोंच शहाजीनें पुन्हा आपली प्रचंड कारस्थाने मोठ्या जोरानें घडाडीने सुरू केलीं; निजामशाहा व मोंगल यांच्यामधील युद्धांत जगदेवराव जाधव हा मोंगलातर्फे शहाजीशी युद्ध करीत होता; तथापि त्याच्याकडून अथवा मोंगलाकडून शहाजीचें पारिपत्य झालें नाहीं, अथवा त्यांना त्यास इतवीर्यही करतां आलें नाहीं; इतकेच नाही तर शहाजीनें सह्याद्रीपर्वताच्या डोंगरी प्रदेशाचा* आश्रय घेऊन लवकरच बरेंच मोठें सैन्य जमविलें; व तो


 * शहाजीनें सह्याद्रि पर्वताच्या डोंगरी प्रदेशाचा आश्रय घेऊन ज्या दालचाली व दौडा केल्या, त्याची योग्य कल्पना होण्याकरितां खालील महत्त्वाची भूगोलविषयक माहिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे; तीः-

 सत्याद्रि पर्वतापासून डोंगराच्या कित्येक रांगा पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेल्या आहेत, त्यांस " सह्याद्रीचे फांटे" असे म्हणतात; या सर्व डोंगरांची व फाट्यांची नावें त्यांतील मुख्य शिखरांवरून पडलेली आहेत. या फाट्यांत साल्हेर मुल्हेरचे ढोंगर, चांदवडचे डोंगर, व औढया पट्टयाचे डोंगर हे विशेष मोठे व महत्वाचे आहेत; त्यांपैकी साल्हेर मुल्हेरच्या डोंगराची ओळ