पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 (७६)

येथे आला; व संगमनेरपासून पुण्यापर्यंतचा सर्व प्रदेश व किल्ले हस्तगत करून घेऊन तो पुणे येथें आला; त्या धामधुमत विजापूरकरांचाही कांहीं 'प्रदेश शहाजीनें लुटला; व हस्तगत करून घेतला; तेव्हा आदिलशाहानें मुरारराव उर्फ मुरारपंत या नांवाच्या एका शूर ब्राम्हण सरदारास शहाजीवर पाठविलें; त्याप्रमाणें मुरारपंतानें तिकडे जाऊन शहाजीच्या ताब्यांतील कांहीं प्रदेश व पुणे इंदापूर वगैरे ठिकाणे आपल्या हस्तगत करून घेऊन शहाजीचा वाडाही जाळून टाकिला तथापि या वेळी शहाजीजवळ फारसें सैन्यबळ नव्हते; त्यामुळे विजापूरकरांचें सैन्य आपणांवर चाल करून येत आहे, असें पाहतांच तो जुन्नर येथें गेला, व आपला स्नेही आणि तेथील सुभेदार श्रीनिवासराव याच्या आश्रयानें त्या ठिकाणी कांहीं काळ वास्तव्य करून राहिला.

इकडे मुरारपंतानें शहाजीस पुन्हां आदिलशाही प्रदेशांत धामधुम करता येऊं नये म्हणून बंदोबस्ताकरितां पुण्यापासून अजमायें तीस बत्तीस मैलांवर असलेल्या " मिलसार " उर्फ " भुलेश्वर "च्या टेकडीवर एक किल्ला बांधिला; त्याचे नांव " दौलत मंगळ " असे ठेविलें; व रामराव या नांवाच्या एका सरदारास दोन हजार सैन्यानिश त्या ठिकाणी ठेविलें; आणि चंद्रराव मोरे व बाजी दळवी वगैरे सरदारांना तळ कोंकण काबीज करण्याकरितां पाठवून तो विजापूर येथे परत गेला.

 त्यानंतर शहाजीनें लागलीच पुन्हां आपले वर्चस्व स्थापन करण्याचा


सडका गेलेल्या असून येवलें-नगर हो एक पोटसडक गेलेली आहे. त्यामुळे पूर्वकाळी दळणवळणाच्या दृष्टीनें संगमनेर हें मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण म्हणून गणले गेलें होतें; प्रसिद्ध अनंदफंदी कवी हा संगमनेर येथेंच होऊन गेला असून संगमनेर जवळच त्याच तालुक्यांत प्रवरा नदीच्या कांठी अश्वी येथे मोठे कुरण असून पूर्वी पेशव्यांच्या वेळीं तेथें सरकारी घोड्याची पागा रहात असे; याच तालुक्यांत निमगांव जाळी या नांवाचे एक खेडेगांव असून दुखच्या बाजीरावाचा कंठमणी प्रसिद्ध त्रिंबकजी डेंगळे, याचे वंशज त्या ठिकाण रहात आहेत.