पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७७)

उद्योग आरंभिला. तो तात्काळ जुन्नर येथून निघाला; त्याच प्रांतांत भीमगड या नांवाचा एक मोडकळीस आलेला किल्ला होता, तो दुरस्त करवून त्यास " शहागड " हे नांव दिलें, व तो तेथें राहूं लागला. X त्यानंतर लवकरच त्यानें फौजेची जमवाजमव करून नाशीक त्रिंबक पर्यंतचा आसपासचा निजाम- शाही प्रदेश काबीज केला; इतकेच नव्हें तर अहंमदनगर व दौलताबाद पर्यंतचा बालेघाटचा प्रदेशही त्याने आपल्या अमलाखाली आणून तो पुन्हां पूर्वीप्रमाणेच निजामशाहीस, व मोगल बादशाहीस एक बलिष्ट शत्रू होऊन राहिला.

 इ. सन १६२७ हें वर्ष ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाचें व क्रांतिकारक आहे- गोब्राह्मणप्रतिपालक, व महाराष्ट्र देशउद्धारक छत्रपति शिवाजी याच वर्षी इकडे दक्षिणेत जन्मास आला; आणि तिकडे उत्तरेंत मोंगल बादशहा जहां- गौर हा मृत्यू पावून त्याचा पराक्रमी पुत्र शहाजहान हा गादीवर आला. शिवाजीच्या जन्मापूर्वी थोडेसें अगोदर - इ. सन १६२६ मध्ये, विजापूरचा पराक्रमी व लोकप्रिय बादशहा इब्राहीम आदिलशहा, आणि निजामशाहीतील अलौकिक योद्धा व मुत्सद्दी मलिकंबर है उभयतां कर्तृत्ववान पुरुष कालवश होऊन दोन्ही राज्य निर्बल झाली होतीं; तथापि त्यांतल्या त्यांत निजामशाही राज्याचा तर, मलिकंबरच्या मृत्यूमुळे, व नंतर पूर्णपणे बोजवारा उडत चालला होता. बादशहा शहाजहान हा पूर्वीपासूनच निजामशाही राज्य बुड विण्याच्या विचारांत होता; त्यामुळे मलिकंबराच्या मृत्यूमुळे त्याला आपला बेत सिद्धीस नेण्यास एकप्रकारें उत्तेजनच मिळाले. इतक्यांतच त्याचा प्रसिद्ध सरदार खानजहान लोदी यानें त्याच्या विरुद्ध बंड केले; ( इ. सन १६२८) बुंदेलखंड व गोंडवण प्रांताच्या मार्गानें तो दक्षिणेत आला; व बागलाणांत शिरून निजामशाहीच्या सरहद्दीवरील डोंगराळ प्रदेशाचा त्यानें आश्रय घेतला. बादशहा बाबर यास हिंदुस्थानांत बोलाविणारा प्रसिद्ध सरदार दौलतखान

 x “ शहाजीनें भीमगढको काबीज किये, बादनिजामशाह बोहोत से मुल्कपर अपना कब्जा कर्लिया; और ७-८ हजार सवारभी जमा करके खुदमुख तारीका झंडा खडा कर्दिया, "" बसातीन-इ-सुलातीन. "