पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७५)

 या वेळी म्हणजे निजामशाहाने जाधवराव वगैरे मंडळांस दग्यानें ठार. मारिलें त्या वेळों शहाजी हा परिंडा+ येथे होता; त्यास ही दग्याची हकीगत कळल्यावर तो अतीशय चिडीस गेला; आणि निजामशाहीशी आपला असलेला संबंध साफ तोडून टाकून तो स्वतंत्र झाला. परिंडा येथून ताबडतोब आपल्या सैन्यासह निघून रस्त्यांतील प्रदेशाची लुटालूट व जाळपोळ करीत तोxसंगमनेर


कन्या नामें राजसवाई उर्फ अंबिकाबाई, ही दिल्ली येथें इ० सन १६९९ मध्ये औरंगझेबाच्या मध्यस्थीनें, व त्याच्या मुलीच्या आग्रहाने शाहू राजे यांस दिली, ती पुढे लवकरच दिल्ली येथे मृत्यू पावली.

 लुकजी व त्याचा मुलगा अचलोजी यांना निजामशाहानें ठार मारल्यानंतर अचलोजीचा मुलगा संताजी उर्फ सुजनसिंह याचें संगोपन जिजाबाईनें केलें, छत्रपति शिवाजी याचा वडील भाऊ संभाजी व हा संताजी हे उभयतांही बहुतेक समवयस्क असून पुढे ते दोघेही शहाजी राजे याचे जवळ कर्नाटक प्रांती असत; व ते उभयतांही कनकगिरी काबीज करण्याच्या प्रयत्नांत असतांनाच. मारले गेले. संताजीस संभूसिंग या नांवाचा एक मुलगा होता; तो शिवाजी जवळ रहात असे; हा संभूसिंगही मोठा पराक्रमी निपजला, व प्रसिद्ध बाजी प्रभू देशपांडे व संभूसिंग, या उभयतांनी मोगलार्शी युद्ध करीत राहून शिवाजी रांगणा किल्लयांत पोहोचेपर्यंत मोठ्या मर्दपणानें खिंड अडवून धरिली. याच संभूसिंहाचा मुलगा म्हणजे भावी काळांतील मराठ्यांचा प्रसिद्ध व पराक्रमी सेनापति धनाजी जाधव " जयसिंग " ( जन्म इ० सन १६५० च्या सुमारास ) हा होय.

 +परिंडा हा गांव निजामच्या राज्यांत नळदुर्न जिल्ह्यांत एक तालू- क्याचें ठिकाण असून तें अहंमदनगर जिल्हयाच्या सरहद्दीवर आहे; व येथील किल्ला पूर्वकाळ विशेष महत्वाचा म्हणून गणला गेलेला आहे.

 xसंगमनेर हे तालुक्याचे ठिकाण, अहंमदनगर जिल्ह्यांत अहंमदनगरच्या वायव्येस भजमा ४९ मैलांवर, व दौंड मनमाड रेलवेच्या बेलापूर स्टेशन- पासून अजमासे ३२ मैलांवर, प्रवरानदीच्या कांठी आहे, तेथून सिन्नरवरून नाशीक, नारायण गंज ते खेडवरून पुणे, व अकोल्यावरून इगतपुरीकडे