पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६८)

तेथून निघून पुन्हा शहाजीचा पाठलाग करूं लागला. पण या अवर्धीत शहाजी निंबाळकराच्या राज्यांत जाऊन पोहोचला होता; त्यामुळे आपण फलटण राज्याच्या हद्दोंत शहाजीच्या पाठलागावर गेल्यास, निंबाळकर शहा. जीस मदत करून ही जोडगोळी उलट कदाचित आपलाच मस्तकभेद करील असे जाधवरावास वाटून त्याने माघार घेतली, आणि इकडे शहाजी निंबाळकराच्या मदतीने पुढील उद्योगास लागला.

 मातुश्री जिजाबाई, हिच्या संबंधानें छत्रपति शिवाजीच्या चरित्रांत ठिक ठिकाणी प्रसंगानुसार उल्लेख हा येणारच आहे; तथापि या ठिकाणीही तिच्या संबंधी थोडासा उल्लेख करणें आवश्यक आहे. जिजाबाई हे जगांतील एक अत्यंत उज्ज्वल, व अत्यंत अलौकिक असे स्त्रीरत्न निर्माण होऊन गेलें; एका साम्राज्य- संस्थापक अशा अत्यंत थोर, व पूज्य विभूतीला जन्म देणा-या या दैदीप्यमान मातेची थोरवी किती वर्णत करावी ? ज्याचा तीही लोकी झेंडा अशा राष्ट्र- पुरुषाला प्रसवणान्या या आईच्या थोरवीबद्दल किती प्रशंसा करावी ? तिनें राष्ट्रपुरुषास निर्माण केलें.मातुश्री जिजाबाई हीच शिवरायाच्या जन्माच्या वेळी झालेल्या प्रसूतिवेदना ह्या साम्राज्यजन्माच्या वेदना होत्या; महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यप्रसूतीच्या वेदना होत्या;या अलोकिक स्त्रीनें प्रत्येक संकटाला व आपत्तीला, हताश न होतां, मोठ्या हिंम तीनें तोंड देत राहून महाराष्ट्राला सुखाचे व स्वातंत्र्याचे दिवस दाखविले; महाराष्ट्राचा उद्धार केला. जिजाबाई हिला शिवाजीसह एकंदर सहा अपत्ये झाली; त्यापैकी पहिली चार अल्पायुषी होऊन वारलीं; पांचवें अपत्य संभाजी; याचा जन्म इ० सन १६२३ मध्ये झाला, व शिवाजीचा जन्म इ० सन १६२७ मध्ये झाला. म्हणजे संभाजी शिवाजाहून चार वर्षांनी मोठा होता. शहाजीच्या वंशापैकी हे वडील घराणे असून यांस " जिंतवंश " असे म्हणतात. संभाजीच्या स्त्रीचे नांव मकाऊ हे असून तिचें पोर्टी पुत्रसंतान नाही, म्हणून विठोजी राजे भोसल्यांचा सहावा मुलगा परसोजी, याचा मुलगा उमाजी हा दत्तक घेतला. उमाजी राजे हा वेडसर होता; संभाजी राजे हा शहाजी राजाजवळ तंजावर प्रांत असून, पुढे आपल्या वयाच्या तिसाव्या वर्षी, इ० सन १६५३ मध्ये कनकगिरीच्या