पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६९)

वेढ्यांत मारला गेला. x संभाजांच्या जन्मानंतर चार वर्षांनी, ती गर्भवासी असतां जाधवरावाच्या कठोर करणीमुळे तिला जो आपत्ती भोगावी लागली, त्या आपत्तीचे दुःख टाळण्याकरितां तर ती माहेरी गेलीं नाहींच, पण पुढेही केव्हां सुद्धां तो माहेरी गेली नाहीं ! या एकाच गोष्टीवरून सुद्धा या असामान्य स्त्रोच्या ठार्थी वसत असलेला करारी स्वभाव, कष्टदायक आयुष्य कंठण्याची तयारी, स्वतःची इभ्रत व अभिमान कायम ठेवण्याकरितां त्रासांत आयुष्य कंठण्याची तत्परता, माहेरचे मिंधें न राहण्याची प्रवृत्ति, स्वतःची कर्तृत्वशक्ति व धमक याबद्दल आत्मविश्वास, वगैरे श्रेष्ठ व प्रशंसनीय सद्रण व्यक्त होतात. जिजाबाई शिवनेरी येथे राहिल्यावर, शालिवाहन शक १५४९, प्रभवनाम संवत्सर, वैशाख शुद्ध पंचमी, रोहिणी नक्षत्र सोमवार या दिवशीं उत्तर रात्रीं ( ता० १० एप्रिल इ० सन १६२७ ) नवमास पूर्ण होऊन


 x या बाबतीत थोडीशी निराळी हकीकत उपलब्ध आहे. ती अशी कीं, संभाजीच्या स्त्रीचे तांव जयंतीबाई हॅ असून त्याच्या मुलाचे नांव उमाजी असे होतें; हा उमाजी वेडसर असून त्याची स्त्री मकाऊ हौस मूल नव्हते; म्हणून तिनें दत्तक घेतला; त्याचें नांव परसोजी; ( राजवाडे; म. इ. सा; खंड १५ लेखांक ५९ पहा. ) त्याप्रमाणेच रा. राजवाडे यांनी " एपि- ग्राफिका कर्नाटिका " या राईटकृत ग्रंथाच्या आधारानें प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून शके १५७६, १५७७ व १५८५ ( म्हणजे इ० सन १६६४, १६६५, व १६७३) ह्या सालांच्या संभाजीच्या सनदा उपलब्ध आहेत; त्या अर्थी संभाजी हा इ० १६६५ पर्यंत तरी निदान जिवंत असला पाहिजे, असे दिसतें; शिवाय " संभाजी राजे ह्यास उमाजी राजे नामक पुत्र कार्तिक वद्य १२ शके १५७६ ( इ० सन १६६४) रोजी झाला " असाही दाखला आढळतो; सारांश संभाजी कधीं मृत्यू पावला, याबद्दल नक्की दाखला आजतागायत उपलब्ध झालेला नाहीं.