पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६७)


शहाजी हा जिजाबाईस शिवनेरी येथें ठेवून फलटणकडे वळला न. वळला तोंच त्याच्या पाठलागावर असलेला जाधवराव त्या ठिकाणी येऊन दाखल झाला. तेव्हां त्यास, जिजाबाई शिवनेरी किल्लयांत असल्याचे समजलें; पण शहाजी- सविषयोंच्या द्वेषामोत त्याचें अपत्यप्रेम नष्ट झाल्यासारखें असल्यामुळे आपली स्वतःची मुलगी हो त्याला शत्रूप्रमाणेच वाटत होती; तिचा कोणत्याही प्रकारें अपराध नम्रतां, " ती शहाजीची स्त्री " याच अपराधाचें प्रायश्चित तिला अन्यायाने भोगावे लागत होते आणि किल्लयांत जाऊन आपल्या मुलीची भेट घेण्याचीही त्याला इच्छा नव्हती; परंतु बरोबर असलेल्या मंडळींनी त्यास जिजाबाईची भेट घेण्याविषयी आग्रह केला; आणि "शहाजीचें व तुमचें वैर असले तरी तुमच्या मुलीनें कांहीं तुमचा तिळमात्रही अपराध केलेला नाहीं; तेव्हां तिला भेटून तुम्ही तिचा समाचार घेणे योग्य आहे, " असा उपदेश केला तेव्हां जाधवरावाचें मन ठिकाणावर आलें; व त्यास आपल्या मंडळींनी दिलेला सल्ला पटून त्याने आपल्या मुलीची भेट घेतली. या प्रसंगाचें चित्र अत्यंत हृदयद्रावक आहे | शत्रूरूपानें लेखणारा, शत्रू. प्रमाणे वागणारा, भेटीस आलेला बाप, आणि जीव जगविण्याकरितो, जिवंत पकडले न जाण्याकरितां, नवरा टाकून गेल्यानंतर, निराधार स्थितीत आलेली मुलगी यांच्यामधील ही दुःखदायक भेट होती ! मोगलांच्या वशिल्याने वैभवशिखरास पोहोंचलेला पिता, आणि तिन्छाइताच्या मेहेरबानीच्या आश्रयानें अत्यंत कष्टांत आयुष्य कंठीत असलेली कन्या, यांच्या मधील ही दुःखदायक मुलाखत होती. जाधवराव शहाजीचा वैरी होता; आणि त्यामु ळेंच तो आपल्या मुलीला पाण्यांत पहात होता; पण मुलीला पाहिल्याबरो- बर त्याच्या दगडी वाटणाच्या मनाला द्रव आला ! आपल्या मुलीची अशी विश्नावस्था होण्याला आपणच कारणीभूत आहोत अशी त्याची खात्री झाली ! लहानपणी मोठ्या प्रेमानें व लडिवाळपणानें कडेखांद्यावर खेळविलेल्या आपल्या मुलीची अशी दीन व भणंग स्थिती करण्यांत आपणच प्रवर्तक आहोत, याब- द्दल त्यास पश्चात्ताप वाटला ! आणि त्याने तिला "माहेरी शिंदखेड येथे चलावयाचें काय १" म्हणून विचारिलें. पण तिनें लागलीच "मला माहेरी यावयाचे नाहीं." असा जानवरावास खडा जबाब दिला. तेव्हां जाधवराव