पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६६)


शत्रूस मिलाफी झाल्यास आपले स्वातंत्र्य नाहींसें होईल, 'निजामशाही राज्य नष्ट होईल, ही गोष्ट लक्षांत न घेतां राजमाता मोंगल पक्षास सामील झाली ! त्यामुळे शहाजीस अतीशय राग आला; ज्यांच्याकरितां स्वतःचा जीव धोक्यात घालून किल्ला लढवावयाचा, तेच मुळीं शत्रुपचास मिळाल्यावर आतां तेथे राहण्यांत अर्थ नाहीं अर्से त्याच्या मनानें घेतलें, आणि त्याने माहुली येथून निघून जाण्याचा बेत ठरवून तो राजमातेस कळविला, व आपली तशी तयारीही केली. पण इतके झाले तरी शहाजीची निजामशाही- बद्दलची निष्ठा कायम होती; त्याला राजमाता व बालराजा निजामशाहा यांच्याबद्दल काळजी होती; म्हणून त्याने आपल्या विश्वासांतील कांहीं मंडळींना त्यांच्याजवळ ठेविलें, आणि एका रात्रों आपल्या निवडक व विश्वासू लोकांनिशीं अकस्मात किल्लघाबाहेर पडून, शत्रूची फळी फोडून (इ० सन १६२७ ) तो मोठया धडाडीनें विजापूरकडे निघून गेला.

 यावेळी शहाजीबरोबर त्याची स्त्री जिजाबाई व वडील मुलगा संभाजी ( जन्म शके १५४५ म्हणजे इ० सन १६२३ मध्ये दौलताबाद येथें ) ही उभयतां असून जिजाबाई ही यावेळी सात महिन्यांची गरोदर होती. शहाजी माहुलीचा किल्ला सोडून निघून गेल्याचें जाधवराव यांस कळल्याबरोबर तो आपल्या सैन्यानिशी शहाजीच्या पाठलागावर निघाला; व त्याने शहाजीचा मोठ्या निकरानें व त्वेषानें सारखा पाठलाग चालविला. त्यामुळे आपण जाधवरावाच्या हात सांपडूं नये म्हणून शहाजीस सारख्या मोठमोठधा दौडा कराव्या लागल्या. परंतु जिजाबाई गरोदर असल्याने तिला घोड्यावरून शहाजीबरोबर पळवेना; म्हणून मार्गातच आपला स्नेही श्रीनिवासराव हा जुन्नर येथें-हें ठिकाण पुण्याच्या उत्तरेस भजमार्से पन्नास • मैलांवर आहे – निजामशाहीचा एक अधिकारी असून तो स्वतंत्रपणे तेथील अधिकार पहात होता. त्याच्या आश्रयाने तिला जुन्नर येथील शिवनेरी किल्लयांत ठेवून तो तसाच फलटणकडे वळला. यावेळी नारो त्रिमल हणमंते, व गोमाजी नाईक पाणसंबळ वगैरे मंडळी तिच्या तैनातीत होतीं; व त्यापैकी गोमाजी हा जिजाबाईचे शहाजीशी लग झाले त्या वेळेपासूनच जाधवरावानें माहेरचा व आपल्या विश्वासाचा मनुष्य म्हणून तिच्या तैनातीस दिलेला होता