पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पावला ! ही हर्कीकत शहाजीस कळल्याबरोबर त्यानें खेळोजीस बरोबर घेऊन ते उभयतां जोहारखानावर तुटून पडले, व उरल्या सुरल्या मोंगली व अदिलशाही सैन्याचाही त्यांनी पूर्ण फडशा उडविला.


बगीनें घोड्यावर स्वार होऊन कसे तरी आपला जीव घेऊन पळाले, म्हणूनच बचावले.

 उद्धवरावाच्या पूर्वी मोंगलांतर्फे हरचंदराय या नांवाचा एक रजपूत सरदार त्या प्रांतावर अंमल करीत होता; परंतु त्याच्या कारकीर्दीत मुलूख ओसाड होऊन तो बंडखोर निघाला, म्हणून त्यास कामावरून काढून टाकून त्या जाग उदाराम याची बादशहाकडून नेमणूक झाली; परंतु हरचंदराय त्या प्रदेशाचा ताबा सोडीना; त्यामुळे अखेरीस उदाराम यास त्याच्याशीं युद्ध करून व त्यांत त्याचा पराभव करून त्या प्रदेशाचा ताबा घ्यावा लागला; तरी सुद्धां पुढे कांही काळ हरचंदराय व त्याचे साथीदार यांच्या कडून त्या प्रदेशास सारखा उपसर्ग पोहोचत राहिला होता; उद्धवराव हा चाळीस वर्षे मोठ्या इभ्रतीनें व पराक्रमानें कारभार करून इ. स. १६३२ ( हिजरी सन १०४२) मध्ये आपल्या वयाच्या ६६ व्या वर्षी मृत्यू पावला व त्याचा मुलगा जगजीवनराव हा दौलतीचा अधिकारी झाला; त्यास बाबूराव या नांवाचा एक मुलगा असून प्रसिद्ध "रायबागीण" ही या जगजीवनरावाचीच बायको होय; ही स्त्री मोठी शूर व कर्तृत्ववान होती; जगजीवनराव मृत्यू पावला, (इ. स. १६५८मध्यें ) त्या वेळीं बाबूराव लहान होता; ही संधी साधून मोंग- लांचा बंडखोर सरदार हरचंदराय यानें पुन्हां उचल खाल्ली; त्यावेळी जगजी- वनरावाची स्त्री व बाबूरावाची आई रायबागीण ही गोषांतील स्त्री असूनही (या उदारामच्या ब्राह्मण घराण्याच्या सर्व शाखांत अद्यापही पडद्याची चाल आहे.) मोठी शूर व कर्तबगार असल्यामुळे, ती या आणिबाणीच्या प्रसंगी पुढे सर सावली; आपल्या लोकांस " बहिणीची लज्जा राखा " अर्से उत्तेजन देऊन; व त्याची खूण म्हणून निशाणास चोळी लावून तिर्ने लष्कर उभें केलें; व हरचंदरायाचा पराभव करून त्यास तिकडून कायमचें हाकलून लाविलें; नंतर ही खबर औरंगझेबास कळल्यावर औरंगझेबास त्याबद्दल विशेष कौतुक वाटलें;