पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५५)

पळून जाणाऱ्या सैन्यास थोपवून धरून, या पाठलाग करणाच्या निजामशाही सैन्याला तोंड दिलें; व एक जोराची चकमक उडून तींत शरफोजी वीर स्वर्ग

त्याच्याशी युद्ध केलें; त्यांत लुकजी व उदाराम हे उभयतांद्दी शहाजहानच्या पक्षांत होते. शहाजादा पावझ व मोहबतखान यांनी शहाजहान याचा पाठलाग केला असतां सर्व मुसलमान सरदार शहाजहान याचा पक्ष सोडून बादशादी पक्षास मिळाले; परंतु लुकजी व उदाराम हे उभयतांही शेवटपर्यंत शहाजहान याच्याच पक्षास चिकटून राहिले; आणि त्यांनी त्यास आपल्या मुलखांत ठेवून घेऊन, व त्यास सर्व त-हेची मदत देऊन, त्याची पुढें रवानगी करून दिली.

 माहूरचा किल्ला उदाराम याच्या ताब्यात असून तो तेथेंच रहात असे. त्याने शहाजहान यांस माहूर येथे नेलें; शहाजहान यानें तेथे आपले जड- जवाहीर, हत्ता, घोडे वगैरे सामान ठेविले व आपण, आपली बायको मुम्ताज- महाल, व पुत्र दाराशोको, सुजा व औरंगझेब यांसह तेथे कांहीं दिवस राहून ( Beniprasad's Jahangir हे पुस्तक पहा. ) नंतर तैलगणांतून तो बंगाल प्रांतांत गेला.

 अशा रीतीनें, शहाजहान यांस लुकजी व उदाराम या उभयतांनी आश्रय दिल्यामुळे त्यांच्यावर बादशहा जहांगीर याची गैरमज झाली; व पुढें शद्दा- जहान याचें बंड मोडल्यावर लुकजी व उदाराम यांना अनुक्रमें आपला मुलगा व भाऊ यांना बादशहाजवळ ओलीस ठेवून पुढे नौकरी करावी लागली.

 उदाराम हा, दक्षिणेत मोंगलांतर्फे एक महत्त्वाचा सरदार म्हणून गणला जात असे, व मोठमोठ्या महत्त्वाच्या कामगिरीवर त्याची नेमणूक व रवानगी करण्यांत येत असे. शहाजहानच्या कारकीर्दीत, निजामशाही सैन्याची व माँगली सैन्याची लढाई सुरू झाली, त्यावेळी लुकजी जाधवराव व राजे उदाराम हे मोगलांतर्फे लढत असतां, इ. स. १६२४ मध्ये, भातवडी या गांवाजवळ मलिकंबर यानें मोंगली लष्करावर अचानक छापा घातला; त्यांत लुकजी व उदाराम हे उभयतां बेसावध असल्यामुळे त्यांच्या सैन्याचा अती- शय नाश झाला, इतकेंच नाहीं तर खुद्द उदाराम व लुकजी हे मोठ्या लग