पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५४)

शरफोजी यानें निजामशाही सैन्यासह त्या पळणाऱ्या सैन्याची लांडगेतोड करण्यास सुरवात केली तेव्हां अदिलशाही सरदार जोइरखान यानें


येथें वंजारी कुणबी जातांचा पद्माजी या नांवाचा एक सरपुरुष होता, त्यास शरण गेला; व त्यास आपली दुःखद कहाणी त्यानें निवेदन केली; त्यावरून त्या साधु पुरुषानें उदाराम यांस आपल्या सन्निध ठेवून घेतलें, व पुढे त्यांस "शहरास" जाऊन रोजगार कर, म्हणजे तुझा भाग्योदय होईल असे सांगि तलें (त्या वेळी त्या भागांत "शहर" हें नांव औरंगाबाद, या शहरास होतें.) त्याप्रमाणे उदाराम हा औरंगाबाद येथे गेला, व एका अमीराच्या दिवाणाच्या घरी राहून त्याच्या बरोबर तो दिल्ली येथे गेला; त्या ठिकाणी असतां, एकदां बादशाहानें त्या अमीरास सांगितलेली कांहीं महत्वाची कामगिरी उदाराम यानें बजाविली, व ती गोष्ट त्या अमीरानें अकबर बादशाहास निवेदन केली; त्यावरून बादशाहानें उदाराम यांस आपणासमक्ष बोलावून त्यास उत्तेजन दिलें; व पुढे वाढवीत वाढवीत त्यास माहूरपासून वाशीमपर्यंत बावन्न चावड्यांची देशमुखी, पांच हजारांची मनसब, व नौबत निशाण वगैरेची सनद देऊन, त्याची बादशाहानें दक्षिणेत रवानगी करून दिली.

 लष्करी कामांतही उद्धवरावानें फार बहादुरी दाखविली; शहाजहान याच्या वेळीही उद्धवरावास ( त्यास नंतर " उदाजीराम " असे कागदों- पत्रों व सर्वत्र नांव पडलें. ) वरील दोन्हीं सरकारांतील देशमुखीवतन व कांहीं जहागिरी मिळाल्या.

 उदारामाची मुख्य कमागिरी जहांगीरच्या कारकीर्दीत घडलेली असून फारशी ग्रंथांवरून असे दिसतें कीं, लुकजी जाधवरावाप्रमाणेच, उदाराम हाही प्रथम निजामशाहीत मलिकंबर याच्या हाताखाली प्रसिद्धीस आला; व इ० सन १६९७ मध्ये मलिकंबरविरुद्ध राजपुत्र खुर्रम (भावी शहाजहान ) यानें जें युद्ध चालविलें, त्यांत तो मलिकंबरचा पक्ष सोडून बादशाही पक्षास मिळाला; शहाजहानबरोबर तो दिल्ली येथे गेला; व इतर यशस्वी सरदारां- बरोबर त्याचाही जहांगीरने गौरव करून त्यास अधिकारसंपन्न केलें.

 त्यानंतर, भावी काळांत शहाजहान यानें जहांगीरविरुद्ध बंड करून