पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५३)

तर मोठाच कहर उसळला ! मोंगली व आदिलशाही सैन्यांतील लोकांनी जिवाच्या भीतीनें समर भूमीतून पळ काढिला, व शहाजीचा धाकटा भाऊ


सैन्यावर छापा घातला, त्या वेळी त्यांच्यावरही मोठेंच प्राणसंकट गुदरलें होतें; परंतु ते मोठ्या लगबगीनें, कसा तरी आपला जीव घेऊन पळाले, म्हणूनच बचावले.

 वशीमकर राजे उदाराम, याचें घराणे जाधवरावांच्या खालोखाल महत्वाचें, व इतिहासप्रसिद्ध आहे. या घराण्याची हर्कांकित थोडक्यांत अशी आहे कीं, ( काळे कृत वन्हाडाचा इतिहास पहा; ) उदाराम घराण्याचा मूळ पुरुष उद्धवराव हा असून त्याच्या वडिलाचें नांव रामाजीपंत होतें; व कागदोपत्री त्याचें नांव " उद्धव रामजी " असें लिद्दीत असल्यामुळे त्याचा अपभ्रंश होत होत " उदाराम हा अपभ्रंश झालेला आहे. उद्धवराव हा मूळ वाशीम येथील राहणारा ऋगवेदी देशस्थ ब्राम्हण असून वाशीमजवळील सावरगांव, चिवरें वगैरे गांवांचें कुळकर्णीपणाचें वतन त्याच्याकडे असे. उद्धवराव हा संस्कृत, फारशी, अरबी वगैरे भाषांत निष्णात होता; तथापि घरची अतीशय गरीबी, त्यामुळे तो वाशीम येथून नौकरी शोधण्याकरितां दिल्ली येथे गेला; या वेळी त्याचा मामा दिल्ली येथें, अकबराच्या कारकीर्दीत दिवाणी खात्यांत नौकरीवर होता; त्यामुळे उदाराम दिल्ली येथे गेल्यावर त्याचा लागलीच सरकारी नौकरींत प्रवेश झाला; त्याची हुषारी व कर्तबगारी अकबराच्या नजरेस आली; आणि त्यानें उदारामाचा दरजा वाढवीत वाढवीत, इ० सन १५९२ मध्यें ( हिजरी सन १००२) त्याला पांच हजारांची मनसब दिली.

 अनंत कृत भक्त रहस्य, (अध्याय ९ ) या नांवाच्या हस्तलिखित ग्रंथांत उदाराम याच्या गरीबीचे व भाग्योदयाचे वर्णन केले आहे; तें असें कीं,

 उदाराम हा इतका गरीब होता कीं, तो दररोज तेथील पाटलाच्या घरून ताक मागून आणीत असे; एके दिवश पाटलाच्या बायकोनें त्याच्या निरुद्योगीपणाबद्दल त्याची निर्भत्सना करून "ताक नाहीं" असे त्यास खडखडीत- पर्णे सांगितले; व त्यानें ताकाकरितां नेलेला तांब्या त्यास फेंकून मारला; त्यामुळे त्यास आपल्या हीन स्थितीबद्दल दुःख व वैताग उत्पन्न होऊन, तो शिरपूर