पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५२)

निजामशाही सैन्याचें आधिपत्य स्वतःकडे घेतलें, आणि शहाजी, शरफोजी, मृत संभाजी वगळून, विठोजीचे खेळोजी, मालोजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, मकाजी, व त्र्यंबकजी, असे सात पुत्र ही भोंसले मंडळी असून सोहमीरखान, मुधाखान वगैरे हबशी सरदार व सारतखान, याकूतखान, पनसूरखान, सुरुपखान, जोहारखान, फत्तेखान, व अहमदखान, हे तुर्क सरदार, कर्नाटकांतील बल्लाळ राजा व बेरडांचा नाईक सिंहराज हे सरदार, व ह्याखेरीज विठोजी, नागोजी, दत्ताजी, नरसिंहराजे, जगदेवराजाचे पुत्र सुंदरराजे वगैरे मराठे सरदार यांच्यासह मोंगली सैन्याशीं युद्ध करण्यास तो पुढें सवसावला; नंतर या परस्पर सैन्यांचा मुकाबला भातवडी या गांवाच्या रानांत होऊन मोठाच घनघोर युद्धसंग्राम झाला; व त्यांत अदिलशाही व मोंगलाई सैन्यांचा पूर्ण पराभव होऊन निजामशाही सैन्यानें त्यांची दाणा- दाण उडवून दिली; (इ. स. १६२४ ) या युद्धांत युद्धोपयोगी जंगी सामान सरंजामासह मोंगलांचे चाळीस हजार सैन्य, व आदिलशहाचें चाळीस हजार मदती सैन्य मिळून मोंगलांतर्फे ऐशीं हजार सैन्य समरभूमीवर आलेले असून मलिकंबरबरोबर शत्रुपक्षाच्या निम्मे म्हणजे फक्त चाळीस हजारच सैन्य होतें; तरीसुद्धां या युद्धांत निजामशाही सैन्य विजयी झालें; शत्रुसैन्याचा पूर्ण धुव्वा उडाला; या युद्धांत शहाजीनें आपलें अद्वितीय शौर्य व्यक्त केले. या युद्धांत शहाजीनें शेंकडों आदिलशाही व मोंगली सरदार, अमीरउमराव व इतर लोक पाडाव करून धरून आणिले;+ व बाकी अवशेष राहिलेल्या सैन्यावर

 * भातवडी हे गांव अहंमदनगरपासून अजमार्से दहा मैलांवर मेहकरी नदीच्या कांठीं आहे; व याच गांवीं हल्ली ती नदी बंधारा घालून अडवून, तेथें तलाव करून त्याचे पाणी पाटानें आसपासच्या शेतांस देण्यात येत आहे.

 + या पाडाव झालेल्या मंडळींतच प्रसिद्ध आदिलशाही सरदार रणदुल्लाखान हा असून तो या वेळीं निजामशाहाच्या नोकरीत राहिला; व याच वेळी त्याचा व शहाजीचा जो स्नेह जडला, तो मरणांत अकृत्रिम कायम राहिला.

 या युद्धांत लुकजी जाधवराव, व माहूरचा देशमुख, आणि वाशीमचा राजा उदाराम ऊर्फ उद्धवराव हे उभयतां हजर होते; आणि मलिकंबर यानें मोंगली